पोलीस यंत्रणा एफ.एफ.सी.पी. – मुस्कान संस्थेमार्फत जनजागृती..


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- खडक पोलीस स्टेशन दामिनी मार्शल व फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने काशेवाडी वस्तीमध्ये माननीय पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड  यांच्या मार्गदर्शन मध्ये वस्तीमध्ये बालकांसाठी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध साठी पथनाट्य सादर करण्यात आले.

फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान संस्थेमार्फत गेली २३ वर्ष बाल लैंगिक अत्याचार विषयी जनजागृती काम सुरू आहे. पुण्यामध्ये शाळा, वस्ती, शासकीय यंत्रणा व समजिक संस्था सोबत याविषयी काम सुरू आहे. मुस्कान मार्फत बालक, पालक, शिक्षक यांच्यासाठी बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा 2012 याविषयी कार्यक्रम असतात. मात्र मुस्कान संस्थे मार्फत पथनाट्य च्या माध्यमातून देखील याविषयाची माहिती समाजामध्ये पोहचवली जाते.

Advertisement

खडक दामिनी निवेदिता यादव यांनी काशेवाडी वस्ती मध्ये मुस्कान संस्थे मार्फत वस्तीतील बालक व पालकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. मुस्कान ने पथनाट्यच्या माध्यमातून बालक म्हणजे कोण. बालकांचे अधिकार, बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय, कोण व कुठे करू शकतात. बाल लैंगिक अत्याचार मुळे बालकावर होणारे गंभीर परिणाम व अश्या परिस्थितीमध्ये बालकांनी घ्यावयाची काळजी. तसेच पालक म्हणून पालकांची भूमिका व पोलीस यंत्रणेकडून मिळणारे सहकार्य याबाबत माहिती दिली. व पॉक्सो कायदा २०१२ बाबत माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी बाल लैंगिक अत्याचार च्या घटना घ्या बालकाच्या जवळच्या नात्यातील लोक करतात तर त्याविषयी पालकांनी न घाबरता अश्या घटना पोलिसात किंव्हा पोलीस हेल्पलाईन 112,1091, 1098 व मुस्कान हेल्पलाईन 9689062202 नंबर वर माहिती देण्याचे आव्हान केले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!