वानवडी परिसरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोर जेरबंद वानवडी पो.स्टे. तपास पथकाची कारवाई
पंकेश जाधव संपादक 7020794626
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ११/०२/२०२३ रोजी १४/३० ते १७/३० वा. दरम्यान नीलकंठ अपार्टमेंट, फ्लॅट नंबर २०१, दुसरा मजला, पटांगण, वानवडी, पुणे येथे फिर्यादी यांचे घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा कि.रु. २.३३.५५०/- रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होतो. त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६७/२०२४, भादंवि कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग, सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींगसाठी दोन पथके तयार केली होती. तपासादरम्यान सीसीटिव्ही मध्ये दिसणारा संशयीत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रेयान ऊर्फ फहिम फैयाज शेख, वय २१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०३, निहाल हाईटस, सना बेकरी, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे हा असल्याचे माहिती मिळाल्याने तात्काळ सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पतंगे साो यांना कळवून तपास पथक प्रभारी संतोष सोनवणे व स्टाफ रवाना झाले. मिळालेल्या माहितीचे आधारे चोरी करणाऱ्या फहिम फैयाज शेख यास ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली. अटक आरोपीचे नाव खालील प्रमाणे –
१) रेयान ऊर्फ फहिम फैयाज शेख, चय २१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०३, निहाल हाईटस, सना बेकरी, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे
वर नमूद अटक आरोपीत याचेकडे अधिक तपास करता त्याने वानवड पोलीस स्टेशन हद्दीत आणखीन दोन ठिकाणी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद आरोपीकडून १) वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १६७/२०२४, भा.दं.वि. कलम ४५४,३८० २) वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २५/२०२४, भा.दं.वि. कलम ४५४,३८० ३) वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६०१/२०२३, भा.दं. वि. कलम ४५४,४५७,३८० हे गुन्हे उघड करण्यात आलेले असून सदर गुन्हयातील चोरी केलेला एकूण ६,७९,२५०/- रु.किं.चा सोन्याचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. पुढील तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर श्री आर राजा, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक संतोष सोनावणे, वानवडी पोस्टे पुणे. हे करत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

