वारजे पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी !पिस्टल बाळगलेल्या सराईतास केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
वारजे पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२२/११/२०२४ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दिमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मनोज पवार व विकास पोकळे यांना त्यांचे बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून तपास पथकाने सापळा रचून पुर्व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार १. ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते, वय २४ वर्षे, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी पुणे, २. सोहम अनंत सातव, वय १९ वर्षे, रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी पुणे यांना रोजरी स्कुलचे विरुध्द दिशेला आकाशनगर कडे जाणारे रोडला पकडून ताब्यात घेतले असता ते एक देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे बेकायदेशीर विनापरवाना बाळगलेले असताना मिळुन आले आहेत. त्यांचेकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व एक मोपेड मोटारसायकल असा एकुण ६५,३००/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते, वय २४ वर्षे, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी पुणे याचेविरुध्द यापुर्वी खुनाचा प्रयत्न, दुखापत, राईट, जबरी चोरी, घरफोडी, अग्नीशस्त्रे तसेच घातक हत्यारे जवळ बाळगणे असे विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचेवर यापुर्वी मोक्काअंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही. मा. पोलीस उप आयुक्त, परि.०३, पुणे श्री संभाजी कदम मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, श्री. सरदार पाटील यांचे आदेशाने वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश बडाख यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रणजित मोहिते पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, मनोज पवार, विजय भुरुक, दक्ष पाटील, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, विकास पोकळे व सत्यजित लोंढे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

