चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याचे साथिदार यांना मेफेड्रॉन (एम.डी.), पिस्टल, इतर हत्यारांसह जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबीग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशनचे हददीत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, श्री. शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी मोहन कळमकर हे तपास पथकासह असे संतोषनगर परीसरात गस्त करीत असताना खास बातमीदामार्फत माहिती मिळाली की, डिलाईट बेकरीसमोर, संतोषनगर, कात्रज, पुणे येथे काही इसम हे हत्यारासह दरोडयाच्या उद्देशाने येणार आहेत.

वरील बातमीप्रमाणे माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. काही वेळातच बातमी प्रमाणे काही इसम सदर ठिकाणी आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या इसमांची नावेः-

१)तौसीफ जमीर सय्यद उर्फ चुहा वय-२८ वर्षे, रा. जामा मस्जीदचे बाजुला, संतोषनगर, कात्रज पुणे.

Advertisement

२) सुरज राजेंद्र जाधव वय-३५ वर्षे रा. मंगळवार पेठ, ता करमाळा, जि सोलापुर.

३) मार्कस डेव्हिड इसार वय-२९ वर्षे रा. रघुनंदन अपार्टमेन्ट, धानोरी पुणे.

४) कुणाल कमलेश जाधव वय-२५ वर्षे पवन स्विट होम शेजारी, सोमनाथ नगर, वडगाव शेरी पुणे.

सदर इसमांचे ताब्यात एकुण १३,७१,१२०-/ रुपये किंमतचा मुद्देमाल त्यामध्ये रु.०३,००,०००/- रुपयांचे १५ ग्रॅम वजनाची पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन रु.४०,५००/- रुपये किंमतीचा एक पिस्टल व एक जिवंत राउंड, ०४,८०,०००/- रुपये मेफेड्रॉन (एम. डी) विक्री करुन मिळवलेली रोख रक्कम, एक लोखंडी कोयता, दोन टुव्हिलर व एक फोर व्हिलर कार तसेच इतर हत्यारासह अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या गुन्हा करण्याचे उद्देशाने विक्री करीता बाळगुन व दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना मिळुन आले आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द भारती विद्यापीठ पो स्टे, गुन्हा रजि नं. ९९७/२०२४ बी. एन. एस कलम ३१० (४), २२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४(२५), एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम २२ (क), २९, म.पो. अधि. कलम ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये वर नमुद चारही इसमांना अटक केली आहे. सदर आरोपींपैकी आरोपी नामे तौसीफ उर्फ चुहा हा गेल्या सहा महिन्यापासून भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी असुन त्यास मा. न्यायालयाने दोन वर्षाकरीता हद्दपार केलेले आहे. आरापी नामे तौसीफ सय्यद उर्फ चुहा याचेवर मोक्का, जबरी चोरी, खंडणी, अंमली पदार्थ विक्री, जिवे ठार मारणे असे विविध १५ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो, मा. पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ-२ पुणे शहर, मा. राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, प्रियंका गोरे सपोनि, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सुरेश शिंदे, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अविनाश रेवे, बाबासो पाटील, निलेश ढमढेरे यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!