मौजे करीता दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या सिंहगडरोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या
पंकेश जाधव संपादक 7020794626
सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हादीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी आणि वाहनचोरी, घरफोडी, अवैध धंदे यांना प्रतिबंधक होणे कामी खाजगी वाहनावर पेट्रोलिंग डयुटी करीत असताना फिरत वडगाव ब्रिजचे खाली आलो असता पोलीस अंमलदार आबा उतेकर, राजु बेगरे, यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत १९/१० वा. बातमी मिळाली की, गिरीजा हॉटेलचे बाजुस असणाऱ्या बसस्टॉप जवळून अंदाजे २० ते २५ वर्षाचे, अंगाने सडपातळ असलेल्या इसमाने दोन दिवसापुर्वी पारे कंपनी चौक येथील हिंदुस्थान पाईप या ठिकाणाच्या समोरील रोडवर पार्क केली तीन चाकी रिक्षा चोरी केली होती तो इसम स्वामी नारायण मंदीराच्या समोरील सर्व्हिस रोडवर थांबलेला असुन त्याने अंगामध्ये निळ्या रंगाचे जॅकेट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातली आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर बातमी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता ती त्यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खातर जमा करुन योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्टाफसह स्वामी नारायण मंदीर नन्हें पुणे येथे जावुन खात्री केली असता बातमीतील वर्णनाचा इसम हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसल्याने व तो सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील वाहन चोर असून त्याची व आमची नजरानजर होताच तो आम्हांस पाहुन सदर ठिकाणीहुन पळुन जावु लागल्याने स्टाफच्या मदतीने त्यास काही अंतरावर दि.२०/०१/२०२४ रोजी २०/४५ वा चे सुमारास पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रथमेश ऊर्फ बाब्या अनिल हजारे वय ३० वर्षे रा. धनगरवस्ती पाण्याचे टाकीजवळ नांदेडफाटा सिंहगड रोड पुणे असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास करता त्यांने
१ सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि नं ३९/२०२४ भा दं वि कलम ३७९,
२. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ४१/२०२४ मा दं वि कलम ३७९
३. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ६२४/२०२३ भा दं वि कलम ३७९
हे केले असुन त्याने चोरी केलेली दुचाकी वाहने त्यांच्याकडुन जप्त केली आहेत, तसेच त्याच्याकडुन वळसंग पोलीस स्टेशन सोलापुर (सोलापुर ग्रामीण) गुन्हा रजि नं २०/२०२४ भा दं वि कलम ३७९ हे गुन्हे उघडकीस आले त्यांच्याकडुन एकुण १.८५,०००/- रुपये किंमतीचे एक तीनचाकी रिक्षा व तीन मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन पुढील अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री प्रविणकुमार पाटील सोो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सोो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ३, पुणे शहर श्री आप्पासाहेब शेवाळे सोो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर श्री. अभय महाजन सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री जयंत राजुरकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, विकास बांदल, विकास पांडुळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, अमोल पाटील, अविनाश कोंडे, दक्ष पाटील यांचे पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

