वयोवृध्द नागरिकास रात्रीच्या वेळी मारहाण करून जबरीने लुटण्याचा प्रयत्न करणा या दोघांना हडपसर पोलीस स्टेशन, तपास पथकाने जेरबंद केले “
आकाश पांचाळ सह संपादक
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- फिर्यादी श्री देविदास काळे, वय ५७ वर्षे हे दिनांक १५/०१/२०२४ रोजी रात्री २३.०० वा. ड्युटीवरुन सुटल्यानंतर घरी पायी चालत जात असताना काळेपडळ परिसरात आले असता, स्कुटीवरुन आलेल्या दोन इसमांनी फिर्यादी यांचे समोर गाडी उभी करुन त्यांचे जवळ येवुन फिर्यादी यांना पैसे काढ असे म्हणून त्यांचे शर्टाचे खिशात हात घालुन त्यांना पैशांची मागणी केली, फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांनी लाथा व बुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचे तोंडाचा जबडा व डाव्या पायास फॅक्चर करुन गंभिर जखमी केले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १३९/२०२४ भा.दं.वि. कलम ३९४,३२३,५०४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे घटनास्थळ असलेले भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासपथक अधिकारी सपोनिरी अर्जुन कदळे, पोउपनिरी अविनाश शिंदे, अंमलदार प्रशांत दुधाळ, अनिरूध्द सोनवणे आणि अमित साखरे यांनी सीसीटीव्ही पाहीले. त्यामध्ये संशयीत २ इसम दिसून आले. प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपासपथकास मिळालेल्या गोपनीय माहीती चे आधारे आरोपी नामे १) रोहीतसिंग जितेंद्रसिंग टाक वय १९ वर्ष रा. नवीन म्हाडा बिल्डींग नं १६, हिंगणमळा ससाणेनगर रोड पुणे. २) कमलेश नरेंद्र भोरे वय २२ वर्ष रा. सदर यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपीकडून त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी ही जप्त करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे हे करीत आहेत
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा साो, व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, मा. आर राजा साो, यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, मा. अश्विनी राख मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. रविंद्र शेळके साो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वास डगळे साो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संदीप शिवले साो, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

