वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी ! वहीणी सोबत संबंध असलेचे संशयावरुन चुलत भावाचा खुन करणारे आरोपीस त्याचे साथीदारास अटक…
पंकेश जाधव संपादक 7020794626
वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:- दि.२१/०१/२०२४ रोजी सकाळी स्टेशन हाऊस ऑफीसर यांना माहीती मिळाली की, कोहीनूर सफायर ताथवडे पुणे येथे एक मजुर बेशुध्द अवस्थेत बिल्डींगचे पाय-यांवर पडलेला आहे. अशी माहीती मिळाले नंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्दू सावर्ड व पोउपनि. सचिन चव्हाण हे तपास पथकासह घटनास्थळी दाखल होवुन माहीती घेणेस सुरुवात केली. मयताचे पोस्टमार्टम झाले नंतर समजले की, मयताचा गळा आवळून त्याचा खुन करणेत आला आहे तसेच त्याचे छातीवर मुका मार मारलेचे खुना आहेत. बांधकाम मजुराचा खुन झालेचे निष्पन्न झाले नंतर मयत नामे प्रमोद यादव याचा भाऊ विरेंद्रकुमार यादव यांनी वाकड पोलीस स्टेशन मध्ये खुनाची तक्रार दाखल केली.
सदरची घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील पोउपनि, सचिन चव्हाण व पोउपनि, अनिरुध्दू सावडे यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अंमलदार यांना तात्काळ सदरचे गुन्हयातील आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले.
त्याप्रमाणे पोउपनि. सचिन चव्हाण व पोउपनि अनिरुध्दू सावडे यांनी दोन वेगवेगळे पथके तयार करुन बांधकाम साईडवरचे मयताचे सहकारी व मयताचे सोबत बिल्डींग मध्ये झोपलेला त्याचा चुलत भाऊ अनुज यादव यांचेकडे वेगवेगळी चौकशी सुरु केली असता माहीती मिळाली की, मयत प्रमोद यादव याचा चुलत भाऊ अनुज यादव यांचेत दोन महीन्यापूर्वी अनुज याचे वहीणी सोबत संबंध असलेचे कारणावरुन वाद झाला होता. तसेच मयत प्रमोद हा अनुज याचे वहीणीस वारंवार फोन करुन बस देत होता. अशी माहीती मिळाले नंतर अनुज यादव यांचेकडे त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सांगीतले की, प्रमोद यादव हा त्याचे वहीणीस तसेच साथीदार लवकुश यादव याचे होणारे पत्निस फोन करुन त्रास देत होता. यामुळे अनुज यादव व लवकुश यादव यांनी मिळून प्रमोद यादव याचे सोबत दारु पिवुन त्यास झोपायचा बहाणा करुन घेवुन बांधकाम चालु असलेले बिल्डींग मध्ये घेवुन जावुन अनुज यादव याने प्रमोद यादव याचा गळा आवळून खुन केला व लवकुश यादव याने प्रमोद याचे छातीत लाथा घालुन त्याचे पाय धरुन ठेवुन खुन करण्यास मदत केली. आरोपींना गुन्हयाचेकामी अटक केली असुन पुढील तपास सपोनि. निलेश नलावडे हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे साो, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त साो, बाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि, सचिन चव्हाण, पोउपनि, अनिरुध्द् सावडे, सपोफो. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ, राजेंद्र काळे, पोहवा, संदीप गवारी, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा, दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा, अतिक शेख, पोना. रामचंद्र तळपे, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि रमेश खेडकर, पोशि. ज्ञानदेव झेंडे, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

