आयुष कोमकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींना गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या !शिवम, शिवराज, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकरला गुजरातमधून अटक….
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आयुष कोमकर खून प्रकरणात मोठी कारवाई ! आंदेकर टोळीतील फरार आरोपींना अखेर गुन्हे शाखेने गजाआड केले. गुजरात सीमेवरून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कोमकरचा निघृण खून करणाऱ्या टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली.
अटक झालेल्यांमध्ये शिवम उदयकांत आंदेकर (३१), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१) आणि शिवराज उदयकांत आंदेकर (२०, सर्व रा. नाना पेठ) यांचा समावेश आहे.
अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले की, आरोपींना गुजरातमधील न्यायालयातून ट्रॉन्झीट रिमांड घेत पुण्यात आणले जाणार असून रविवारी न्यायालयात हजर केले जाईल.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात आधीच बंडु आंदेकरसह ८ जणांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई सुरू आहे. पोलिसांनी आंदेकर व वाडेकर यांच्या घरातून ७० लाखांचे सोने व महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली होती. तपास सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

