दुचाकी चोरटयाकडुन चोरीस गेलेली दुचाकी, अग्निशस्त्र व १० जिवंत काडतुसे केले जप्त.


प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे दि.१७/१०/२०२५ रोजी गु.र.नं. ४७०/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील तपास पथक पोलीस अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी बिबवेवाडीचे दिशेने चोरीची मोटारसायकल घेवुन गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सदर ठिकाणी जावुन लोणी काळभोर पोलीसांनी आरोपीस दि.२८/१०/२०२५ रोजी ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता आरोपीने त्याचे नाव अरुण बाबुराव देशमुख, वय ६७ वर्षे, रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, पुणे. असे सांगितले असता त्याला अटक केली.
सदर गुन्हयाबाबत आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्याचेकडून सदर गुन्हयात चोरीस गेलेली दुचाकी अॅक्टीवा गाडी जप्त करण्यात आली. नमुद आरोपी हा चोरीचे गुन्हे करण्यात सराईत असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आल्याने सदर पोलीस पथकाने आरोपीचे अधिक तपास केला असता नमुद आरोपीचे राहते घरातील एका बॅगमध्ये एक अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर), १० जिवंत काडतुसे व ३० बनावट चाव्या असा एकुण ६५,०००/- रु. किं. चा माल मिळून आला असता जप्त करण्यात आला
सदरची कामागिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५. पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, श्रीमती. अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्मिता पाटील यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार सातपुते, शिरगिरे, कुदळे, पाटील, माने, विर, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, दडस व गिरी यांनी केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!