बाळाला आईच्या सुखरूप ताब्यात देताना पोलिसांचे डोळे पाणवले


प्रवीण साळुंखे पुणे ग्रामीण प्रतिनिधी
रांजणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण
महापोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-  27/10/2025 रोजी दुपारी 1:30 वा. चे सुमारास रांजणगाव midc पोलीस स्टेशन येथे रिक्षाचालक सद्दाम अकबर खान रा शिरूर जी. पुणे हे आपल्या सोबत 3 वर्ष्याच्या मुलाला घेऊन आला व हा मुलगा मला कारेगाव गावचे हद्दीतील अहिल्यानगर ते पुणे रोड लगत असलेले हॉटेल पाटिलवाडा येथे मिळून आला असून त्याला काही एक माहिती सांगता येत नाही तरी आपण याचे आई – वडिलांचा शोध घ्यावा असे सांगून त्या लहान मुलास पोलीस स्टेशन येथे पोलिसांचे ताब्यात देऊन निघून गेले. सदरची माहिती पोलीस ठाणे अंमलदार पो. हवा.वैजनाथ नागरगोजे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे साहिबांना सांगितली व तात्काळ वरिष्टांच्या आदेशाने दोन पोलीस पथके तयार करून मुलाचे आई वडिलांचा शोध घेण्यास सुरवात झाली.
सदर मुलाचे आई वडिलांचा लवकरात लवकर तपास लागावा यासाठी सोशल मिडीयचा वापर करणेत आला. त्यामध्ये सदर मुलाचे आई – वडिलांचा शोध होणेबाबत व्हिडिओ प्रसारित करून उपयुक्त माहिती रांजणगाव midc पोलीस स्टेशन येथे कळविणेबाबत आव्हान करणेत आले. सायंकाळी 6:00 वाजनेचे सुमारास महिला नामे दिव्यभारती राम खिलारी रा. कारेगाव ता. शिरूर जी पुणे या पोलीस स्टेशन ला आल्या व सदर मुलगा माझा असल्याचे सांगून त्याचे नाव मटरू राम खिलारी वय 3 वर्ष असून मी कामानिमित्त घराबाहेर गेले असता तो घरातून निघून आला त्यानंतर मी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यामुळे मी खूप हाताश झाले होते. सायंकाळी माझ्या शेजारी राहणाऱ्या बाईने सोशल मीडियावर प्रसारित झालेला माझे मुलाचा रांजणगाव पोलिसांनी बनवलेला व्हिडिओ दाखवला तेव्हा मी धावत पळत पोलीस स्टेशन ला आले आहे. सदर महिलेची संपूर्ण खात्री करून पोलिसांनी लहान चिमुकल्यास आई च्या स्वाधीन केले. रांजणगाव पोलिसांनी, महिला अंमलदार यांनी चॉकलेट, खेळणे व मायेने जीव लावलेने तो आई कडेही लवकर जायला तयार होतं नव्हता..महिला अंमलदार याचे डोळेही पाणवले होते…..
सदरची अभिमानास्पद कामगिरी पो. निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे साहिबाच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा वैजनाथ नागरगोजे, पो. कॉ.आकाश सवाने, पो.कॉ. संदीप भांड, योगेश गुंड महिला अंमलदार शीतल रौंधळ,पूजा नाणेकर यांनी

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!