हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! चारचाकी गाडी चोरास केले जेरबंद
आकाश पांचाळ सह संपादक
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- फिर्यादी यांची दिनांक २१/०२/२०२५ रोजी कॅनालजवळ, पवार कॉलनी शेजारी लेन नंबर ६ येथे त्यांची सुझुकी कंपनीची डिझायर चारचाकी कार ही लॉक करुन पार्किंग केलेली होती ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने त्याबाबत हपडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं २३१/२०२५ भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संजय मोगले, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपास पथक पोलीस उप निरीक्षक सत्यवान गेंड व तपास पथक अंमलदार दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड असे तपास करीत असताना, त्यांनी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेले भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहीले. व ते प्राप्त सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनिय बातमीवरून आरोपी नामे नारायण दत्तु थोरात वय ३३ वर्ष रा. चिंतामणी सोसा झेड कॉर्नर, जवळ मांजरी पुणे यास ताब्यात घेवून त्याचे कडे केले तपासात त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून त्याने चोरून नेलेली कार किं.रू ४,००,०००/-रू. ची ही काढून दिल्याने ती पंचनाम्याने हस्तगत करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिपक कांबळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि. ५ पुणे डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाविर लोंढे, महेश चव्हाण, बापु लोणकर, लखन दांडगे यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

