सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पथकाने मिरा भाईंदर परिसरातुन दोन आरोपीना केले अटक


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड गु.र.नं.०६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३(५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ सी, ६६ (डी). मधील फिर्यादी यांना ventorus कंपनीमधुन व कंपनीचे नावाने बोलणारे अकाउंट मेनेजर अबु बाकर, रोहन अग्रवाल, सपोर्ट ग्रुप जोसेफ, ईरिका व्ही असे बोलत असल्याचे सांगुन त्यांचे ventorus कंपनीमार्फत फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणुक केल्यानंतर खात्रीशीर जास्त परतावा देण्याचे अमीष दाखवुन त्यांचे www.ventorus.com या वेबसाईटवर वर रजिस्ट्रेशन करण्यास व त्यावरुन फॉरेक्स ट्रेडींगकरीता वर नमुद बँक अकाऊंटवर एकुण 1,30,23,515.34 रुपये रक्कम भरण्यास भाग पाडुन थोडया स्वरुपात परतावा देवून एकुण १,१२,९६,३८०/- रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याने फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचा तपास करत असताना दाखल गुन्हयातील फसवणूक रक्कम अहमदाबाद, गुजरात राज्य व बोरीवली, मुंबई याठिकाणावरील बँकेच्या शाखेमधून काढत असल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद अकाउंट बाबत तांत्रिक तपास करता सदरचे अकाउंट मधून रोख स्वरुपात रक्कम काढणारे संशयीत आरोपी हे अहमदाबाद, गुजरात येथे असल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत तपास करणे करीता मा. वरिष्ठांचे आदेशाने सपोनि प्रविण स्वामी व पोउपनि सागर पोमण सायबर पोलीस स्टेशन यांच्या २ तपास टिम अहमदाबाद येथे रवाना करण्यात आल्या होत्या. सदर तपास टिमने २ दिवस अहमदाबाद शहरामध्ये संशयित आरोपीचा शोध घेवुन सदरठिकाणी सापळा रचून रोख रक्कम काढणारा आरोपी नामे मितेश राजुभाई व्होरा वय ३४ वर्षे रा. जी ३०३, स्वामीनारायण पार्क, नवा वाडज, अहमदाबाद यास ताब्यात घेतले व त्याचा साथीदार हा मिरा-भाईंदर परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि प्रविण स्वामी यांच्या पथकाने मिरा-भाईंदर परिसरामधून आरोपी नामे केपिन अजितकुमार मेहता वय ४१ वर्षे रा. बी-५०३, मानसी टॉवर, वस्त्रापुर, अहमदाबाद यास ताब्यात घेतले आहे. दाखल गुन्हयातील आरोपी मितेश व्होरा हा केपिन याचे सांगणेवरुन वेगवेगळ्या बँक खात्यांमधुन रोख स्वरुपात रक्कम काढुन केपिन याचेकडे वेगवेगळ्या स्वरुपात रोख रक्कम पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयामधील आणखी आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याअनुषगाने अधिक तपास चालु आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोनि रविकिरण नाळे सायबर पोलीस स्टेशन हे करत आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि सागर पोमण, पोउपनिरी वैभव पाटील, पोउनिरी प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, सौरभघाटे, सुरज शिंदे, जयश्री माळी, सरीता तुपे, शुभांगी ढोबळे, धरती वाडेकर, ईश्वरी आंबरे, वैशाली बर्गे, धनश्री प्रधान, मोनिका बिच्चेवार,, दिपाली चव्हाण सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!