गुन्हे शाखा युनिट 2 ची कौतुकास्पद कामगिरी ! दरोड्यासारख्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२४/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा व रेकार्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, नागनाथ राख व विजयकुमार पवार यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२५ भा.न्या.सं.क. ३१० (४),३१० (५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) संह १३५ आर्म अॅक्ट ४ (२५) मधील पाहिजे आरोपी नामे करण रवि पटेकर ऊर्फ कोळगे हा दरी पुलाखाली थांबले बाबत माहिती मिळाली.
त्याबाबत युनिट २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांना कळविले असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत कळविले. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीबाबत मिळालेली गोपनिय माहिती प्रमाणे दरीपुला खाली आंबेगाव पुणे येथे गुन्हयातील पाहिजे आरोपी मिळून आला. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असतात्याने त्याचे नाव करण रवि पटेकर ऊर्फ कोळगे वय २२ वर्ष रा. मेघ स्पर्श सोसायटी बालाजीपार्क समोरनारायण मंदिराजवळ आंबेगाव पुणे असे असल्याचे सांगीतले सदर आरोपीस पुढील कारवाईकामी आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे, सपोनि कवठेकर, सपोनि रसाळ, पोलीस अंमलदार मोकाशी, राख, पवार, टकले, नेवसे, चव्हाण, रसगर, कुंभार, आबनावे, दळवी, थोरात, मांढरे, शेख, तांबोळी, म. पोलीस अंमलदार ताम्हाणे या पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!