मोकासारख्या गंभीर गुन्ह्यात चाकण पोलीस स्टेशनला दोन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी युनिट दोन कडून जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा यूनिट २ पुणे शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- दि. 31/08/2024 रोजी मा. पो. आयुक्त सो, पुणे शहर यांचे आदेशान्वये कोम्बिंग अॅापरेशन करणेत येत असताना,युनिट -2 कडील पो. हवा उज्वल मोकाशी/1780 व पो .हवा शंकर कुंभार,/ 6596यांना बातमी मिळाली की *चाकण पो स्टे गु.र.नं 1866/2022 ipc 395,365,341,323,506 arms act 4(25) व MCOC* मधील पाहिजे आरोपी नामे- अरविंद उर्फ सोनू नवनाथ घोलप, ३२ वर्ष रा. भवानी माता मंदिरा जवळ, रामटेकडी ,पुणे हा रामटेकडी परीसरात फिरत आहे, सदर माहितीचे आधारे कोम्बिंग अॅापरेशन करीत असलेले युनिट 2 चे पथक तात्काळ रामटेकडी परीसरात गेले असता, नमूद आरोपी हा अंध शाळेजवळ रोडवर मिळून आला, त्यास ताब्यात घेऊन चौकशी करता, तो नमूद गुन्ह्यात पाहिजे असलेची खात्री झालेने त्यांस पुढील कार्यवाहीकामी वैद्यकीय तपासणी करून चाकण पो स्टे चे ताब्यात देणेत येत आहे..
सदरची कारवाई मा.पो.उपायुक्त, गुन्हे श्री.निखिल पिंगळे सर, स.पो.आयुक्त,गुन्हे-1 श्री. गणेश इंगळे सर, यांचे मार्गदर्शनाखाली Unit-2 गुन्हे शाखेचे पो. नि.प्रताप मानकर, सपोनि अमोल रसाळ, पो.ह.संजय जाधव,पो.ह.शंकर नेवसे, पो.ह.उज्वल मोकाशी,पो.ह.शंकर कुंभार,पो.अं. निखिल जाधव,म.पो.ह. साधना ताम्हाणे यांचे पथकाने केली आहे…
आदरपूर्वक सादर..

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

