मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे कारागृह ध्वज दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले
पंकेश जाधव संपादक 7020794626
मुंबई मध्यवर्ती कारागृह,मुंबई
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन मुंबई :- सविनय सादर करण्यात येते की, मा.मुख्यालयाकडील आदेशाप्रमाणे, आज दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे कारागृह ध्वज दिनानिमित्ताने कारागृह अधीक्षक यांचे हस्ते सकाळी ठिक 7.50 वाजता सर्व कारागृह अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर कारागृहामध्ये उल्लेखनीय कामगीरी केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना कारागृह अधीक्षक यांचे हस्ते प्रशंसापत्र अदा करुन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कारागृह ध्वज दिननिमित्ताने मागील आठवडाभरामध्ये बंदयांकरीता विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर क्रिडा स्पर्धेमध्ये एकुण-55 बंदी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर क्रिडीस्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आज कारागृह ध्वजदिनानिमित्ताने कारागृह अधीक्षक यांचे हस्ते प्रशंसापत्राचे वाटप करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमादरम्यान बंद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या बंद्यांनी विविध देशभक्तीपर गितांचे गायन केले. तसेच कारागृह ध्वजदिनानिमित्ताने बंदयांना राष्ट्रीय सणाप्रमाणे गोड जेवणाचे वाटप करण्यात आले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

