कल्याण जिल्हा कारागृह, कल्याण येथे कारागृह ध्वज दिनानिमित्ताने ध्वजारोहन कार्यक्रम पार पाडण्यात आला


पंकेश जाधव संपादक 7020794626

कल्याण जिल्हा कारागृह, कल्याण

महा पोलिस न्यूज ! ऑनलाइन कल्याण :- मा.श्री. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांच्या प्रेरणेतुन व मा. श्री. योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी कल्याण जिल्हा कारागृह, कल्याण येथे कारागृह ध्वज दिनानिमित्ताने सकाळी 07.50 वाजता कारागृहाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थितीत ध्वजारोहन कार्यक्रम पार पाडण्यात आला.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर अधिकारी कर्मचारी यांचेसाठी अल्पोपहार ठेवण्यात आला होता. कारागृहातील बंद्यांना राष्ट्रीय सणाप्रमाणे गोड जेवणाचे वाटप करण्यात आले. तसेच कारागृहामध्ये दाखल महिला व पुरुष बंद्यांचे अंतर्गत गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे बंद्यांमध्ये आनंदाचे व प्रसन्नदायी वातावरण होते. ध्वजदिनासाठी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना कारागृह ध्वजदीनाचे महत्व सांगून कारागृह विभागाप्रती सचोटी, निष्ठा व आपला सेवाभाव सदैव ठेवणेबाबत व जनमानसात कारागृह विभागाची प्रतिमा उंचावेल अशा प्रकारे आपले कर्तव्य करणेबाबत कारागृह अधीक्षक श्री प्रदीप जगताप यांनी सर्वाना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अत्यंत उत्साही व प्रसन्नदायाी वातावरणात पार पाडण्यात आला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!