भारती विद्यापीठ पोलीसांची दमदार कामगिरी ! अपहरण करुन गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन खंडणी उकाळणान्या आरोपींना अटक
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०७/१२/२०२५ रोजी सायंकाळी ०८.०० वा ते दिनांक ०८/१२/२०२५ रोजी रात्री ०१/०० वा सुमारास फिर्यादी प्रकाश दिनकर जोरी, वय २८ वर्षे, व्यवसाय डिलीव्हरी बॉय, रा.प्लॅट नं २६, शिवम हिल व्हीव, दौलत पेट्रोलपंपाचे मागे, भुगाव पुणे यास गुन्हयातील मुलीने कात्रज चौकात भेटायला बोलवुन घेवुन त्याचे सोबतम कात्रज घाटाकडे बाईकवरुन कात्रज घाटाकडे जात असताना नमुद महीलेचे साथीदार राहुल शितोळे, ऋषीकेश सुरते, इंन्स्टावरील अकाऊंट धारक_mr_ak_302_ व त्यांचे दोन साथीदार यांनी फिर्यादी यांना थांबवुन धमकी देवुन राहुल शितोळे, ऋषीकेश सुरते, इन्स्टावरील अकाऊंट धारक mr ak 302 यांनी त्यांना जबरदस्तीने येवलेवाडी येथे घेवुन जावुन त्या ठिकाणी अक्षय शेलार, व त्यांचे दोन साथीदार यांनी त्या ठिकाणी येवुन सर्वानी मिळून फिर्यादी यांना शिवीगाळ व हाताने मारहान करुन पोक्सो अंर्तगत गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन तसे न करण्यासाठी ७०,०००/-रुपयेची मागणी करुन त्यापैकी खंडणी म्हणून रोख रुपये १०,०००/- घेवुन उर्वरीत खंडणीचे रक्कमेसाठी सतत फोन करीत आहेत म्हणुन फिर्यादी तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५५६/२०२५, भारतीय न्यायसंहिता कलम ३०८ (२), ३०८ (३), १४०(२), ११५ (२), ३५१ (२), ३५२.३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार हे आरोर्षीचा शोध घेत असताना त्यांचेकडुन मिळालेल्या बातमीवरुन दाखल गुन्हयामध्ये आरोपी १. अक्षय गंगाधर बधेवार, वय-२२ वर्षे, रा. गोकुळनगर, कात्रज, पुणे. २. अमोल अंकुश शिंदे, वय-२८ वर्षे, रा. कर्वेनगर, कोथरूड, पुणे. ३. राहुल तानाजी शितोळे, वय-२३ वर्षे, रा. फलॅट नं.१०५, लंबोदर अपार्टमेंट, महादेवनगर, शेलार मळा, कात्रज, पुणे यांना दिनांक १०/१२/२०२५ रोजी २१.०० वा. अटक करण्यात आली असुन, गुन्हयातील विधीसंघर्षीत मुलीस ताब्यात घेण्यात आले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सपोनि थोरात हे करीत आहेत. अशा प्रकारचे आणखीन गुन्हे कोणासोबत घडले असल्यास त्यांनी पोलीसांना माहीती दयावी असे पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सपोनि स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार, नागेश पिसाळ, महेश बारवकर, मंगेश पवार, नवनाथ खताळ, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, किरण साबळे, मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

