लोणीकंद पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीचा वापर करुन हातभट्टया केल्या उध्वस्त.


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे  :- मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर यांनी अवैध धंदे उध्वस्त करणेबाबत आदेशीत केले असताना देखिल काही अवैध धंदे चालविणारे हे लपुन छपुन भट्टी लावुन गावठी दारु तयार करीत असलेबाबत गोपनीय बातमीदारा मार्फतीने माहिती प्राप्त करुन दिनांक ०८/०२/२०२४ रोजी लोणींकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे यांचे नेतृत्वाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, सपोफौ बाळासाहेब सकाटे, पोशि ४५८५ रोकडे, पोशि १०२७३ सपुरे, पोशि २७७० कोकरे यांचे एक पथक पेरणे पोलीस चौकीचे हद्दीत तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, तपास पथकातील पोना ७४४७ फरांदे, पोना ७६२१ साळुंके, पोना ७४१९ जाधव असे पथक तयार करुन त्यांना वाघोली पोलीस चौकीचे हद्दीत ग्रामीण भागातील डोंगराळ व दुर्गम भागातील ओढे व नदीलगत चालु असणा-या हातभट्टयांवर कारवाई करणेकामी रवाना केले होते.

त्याअनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे तसेच पेरणे चौकीचे अधिकारी सपोनि निलेश घोरपडे व तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व पथक यांनी पेरणे पोलीस चौकीचे हद्दीत मौजे पेरणे गावचे हद्दीत कोळपे वस्ती पेरणे बकोरी शिव लगत ओढयाच्या कडेला असलेल्या मोकळया जागेत महिला नामे माधुरी रमेश परदेशी ही गुळमिश्रीत रसायनचा वापर करुन हातभट्टी लावुन गावठी दारु तयार करीत असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी छापा टाकुन एकुण ६०,६००/- रुपये किंमतीचे गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कच्चे रसायन, तयार गावठी दारु ही जेसीबी च्या साहय्याने उध्दव करुन माधुरी रमेश परदेशी, वय ४० वर्ष, रा. कोळपे वस्ती, पेरणे, ता. हवेली, जि. पुणे हिचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व पथक यांनी वाघोली चौकीचे हद्दीत मौज भावडी गावचे हद्दीत बोरकर वस्ती या ठिकाणी साहिल संजय राजपुत हा गुळमिश्रीत रसायनचा वापर करुन हातभट्टी लावुन गावठी दारु तयार करीत असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीसांनी छापा टाकुन एकुण ४८,८००/- रुपये किंमतीचे गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कच्चे रसायन, तयार गावठी दारु ही जेसीबी च्या साहय्याने उध्दव करुन साहिल संजय राजपुत, वय २५ वर्ष, रा. बोरकर वस्ती, भावडी, पुणे याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. विजय मगर साो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील साो, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली मा. श्री. विश्वजीत काइंगडे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, सपोनि रविंद्र गोडसे, सपोनि निलेश घोरपडे, पोउपनि राहुल कोळपे, सपोफौ बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, साईनाथ रोकडे, मल्हारी सपुरे, दिपक कोकरे, अजित कारकुड, विठ्ठल केदारी, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर हददीमध्ये कोठेही अवैध धंदे चालू असतील त्याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर मो.नं. ९५२७०६९१०० यावर संपर्क साधणेबाबत मा. श्री. विश्वजित काइंगडे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी आवाहन केले आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!