पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे, डॉ. जालींदर सुपेकर, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे. यांचे प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य “सुधारणा व पुनर्वसन” याप्रमाणे कोल्हापुर मध्यवर्ती कारागृहात बंदी सुधारणा व पुनर्वसनासाठी सुतारकाम, लोहारकाम, शिवणकाम, यंत्रमाग, बेकरी विभाग व करवीर निवासनी श्रीमहालक्ष्मी (अंबाबाई) लाडुप्रसाद अशा विविधप्रकारचे बंद्यामार्फत उपक्रम राबविले जातात. यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कार वॉशींग सेंटरचा समावेश करण्यात आला आहे. सदर कार वॉशींग सेंटर तसेच महाराष्ट्र शासनाकडुन प्राप्त निधी व जिल्हा नियोजन समिती, कोल्हापुर. यांचेकडुन पाप्त निधीमधुन करण्यात येणाऱ्या विविध कामांचे मा.श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा. पुणे-६. यांचे शुभहस्ते व मा. संजय पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापुर, यांचे प्रमुख उपस्थित उद्घाटन व भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे. यांचे शुभ हस्ते कोल्हापुर मध्यवर्ती कारागृहामार्फत सुरु करण्यात येणाऱ्या कार वॉशींग सेंटरच्या कोनशिलेचे अनावरण करुन उद्घाटन करण्यात आले. सदर कार वॉशींग सेंटरमध्ये कोल्हापुर वासीयांसाठी स्थानिक खाजगी वॉशींग सेंटरच्या दरापेक्ष्या तुलनेने कमी दरामध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कारागृहनिर्मित वस्तुच्या विक्रीकरीता सुसज्ज विक्रीकेंद्र इमारत बांधकाम, कारागृहातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी चेंजींगरुम/ रेस्टहॉऊस इमारत बाधंकाम, कारागृहाचे मुख्यतटभिंतीच्या बाहेरील बाजुने सिमेंट रस्ता, मुख्यतटभिंतीच्या आतील बाजुने डांबरीकरण रस्ता, मुख्यतटभिंतीवर चेनिलींग फिनिशींग व मुख्यतटभिंत दुरुस्ती इत्यादी कामांचे भूमिपुजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उद्घाटक म्हणुन मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा. पुणे व प्रमुख पाहुणे म्हणुन मा. संजय पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापुर, उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमासाठी मा. श्री. पांडुरंग भुसारे, कारागृह अधिक्षक, उपअधिक्षक श्री. साहेबराव आडे, प्रशासन अधिकारी श्री. अरुण डेरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. चंद्रशेखर देवकर, श्री. सतिश कदम, श्री. सोमनाथ मस्के व श्रीमती. एस.एस.वाघ, बांधकाम तुरुंगाधिकारी श्री. विठ्ठल शिंदे तसेच इतर सर्व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!