पुण्यात भारी ! लोणीकंद तपास पथकाची कामगिरी !मिसींग झाल्याचा बनाव करुन खून केलेल्या गुन्हयाची केली उकल
पंकेश जाधव संपादक 7020794626
लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २८/१०/२०२३ रोजी एक ३८ वर्षीय महीला मिसींग झाली होती तिचा पती नामे अमोलसिंग मुरली जाधव वय २६ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराजवळ, महेश गोरे यांचे भाडयांचे खोलीत फुलगाव ता. हवेली जि पुणे, मुळ रा. मु.पो. अंजिनाईक ता. अरणी जि. यवतमाळ तसेच घर नं. ४/५ ४७६ गायत्री मंदीर नवीन पुल नांदेड याने दिलेल्या खबरीवरुन लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर या ठिकाणी मनुष्य मिसीग रजि क्र. १९३/२०२३ अन्वये मिसीग दाखल करण्यात आली होती. सदर मिसींगचा तपास पोलीस हवालदार ५४४८ प्रकाश आव्हाळे यांचेकडे सोपविण्यात आला होता
मिसींग दाखल झाले पासुन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री रविंद्र गोडसे हे त्यांना मार्गदर्शन करीत होते. तपासादरम्यान आरोपी अमोलसिंग मुरली जाधव याने त्याचे नातेवाईकांची नावे पोलीसांना पुरविली व स्वत ही सदर मिसींगचे तपासकामी मदत केली, काही ठिकाणी तो स्वतःच पोलीसासोबत पत्नीचा शोध घेण्यासाठी गेला. सदरचा आरोपी हा इन्द्रो प्रा. लि. मरकळ पुणे या कंपनीमध्ये मजुरी काम करीत होता त्याची पत्नी गृहीणी होती. मिसींग दाखल केलेच्या दिवशी तो दिवसभर कामावर हजर असल्याचे तो काम करीत असलेल्या कंपनीत गेटवर केलेल्या नोंदीवरून समोर आले. त्याने स्वतःचा मोबाईलही १५ दिवसापासुन बंद असल्याचे सांगितले ” दृष्यम ” सिनेमाप्रमाणे त्याचे स्वतःवर संशयाची सुई येवु नये याची पुरेपुर त्याने खबरदारी घेतली होती. मिसींग महीलेचा शोध घेण्याचे पोलिसांचे सर्व प्रयत्न फोल ठरत होते. त्यामुळे पती अमोलसिग मुरली जाधव यालाच वारंवार तपासकामी बोलाविले गेले. प्रत्येक वेळी तपासामध्ये त्याचे बोलण्यामध्ये थोडी थोडी विसंगती येत असल्याचे निर्दशनास येवु लागले. तसेच त्याचे चेह-यावरील भाव हे पुर्णपणे नैसर्गिक नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यावरील संशय वाढतच गेला अखेरीस दिनांक १३/०१/२०२४ रोजी सपोनि गोडसे व पोलीस हवालदार ५४४८ श्री प्रकाश आव्हाळे यांनी वपोनि श्री. विश्वजित काइंगळे यांचे मार्गदर्शनाखाली केलेल्या चौकशीदरम्यान त्याने २८ ऑक्टोबर रोजी वाई सातारा जवळील मांढरदेवी घाटात पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची व तिचे प्रेत दरीत ढकलुन दिल्याची कबुली दिली. त्यावर लगेचच पोलीस उप निरीक्षक श्री रेशीम कोळेकर, पोना ७४१९ / श्री स्वप्निल जाधव, पो ना ७४४७/ श्री अजित फरांदे यांचे एक पथक तयार करण्यात आले. व ते मांढरदेवी देवस्थान, वाई या ठिकाणी रवाना करण्यात आले. सदर पथकाने मांढरदेवी देवस्थान, वाई घाटात सुमारे २०० ते २५० फूट खोल दरीत उतरुन कसोशीने शोध घेतला अथक प्रयत्न केल्यावर सुमारे अडीच महीन्यापूर्वी मृत्यु झाला असल्याने त्यांना मिसींग महीलेचा केवळ सांगाडा तिची चप्पल, साडी व बागडया मिळून आल्या, मयत महीलेच्या सांगाडयाचे ससुन हॉस्पीटल, पुणे या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले आहे. पोलीस हवालदार ५४४८/ श्री प्रकाश आव्हाळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी नामे अमोलसिंग मुरली जाधव वय २६ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराजवळ महेश गोरे यांचे भाडयाचे खोलीत फुलगाव ता. हवेली जि. पुणे मूळ रा. मु.पो. अजिनाईक ता. अरणी जि यवतमाळ तसेच घर नं. ४/५ ४७६ गायत्री मंदीर नवीन पुल नांदेड, याचे विरुध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३२/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३०२,२०१,१८२ अन्वये गुन्हा नोंदविला असून सदर गुन्हयात आरोपीला अटक करण्यात आली असुन आज मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
पत्नी आपल्यापेक्षा बारा वर्षांनी मोठी आहे, आपली इच्छा नसतानाही पालकांनी आपले तिच्याशी लग्न लावुन दिले आहे, तसेच ती थोडी मंदबुध्दी आहे. त्यामुळे आरोपीने तिला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला परंतु तिने त्याला नकार दिल्याने अमोलने तिचा कायमचा काटा काढायचे ठरवले व अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबध्द पध्दतीने सदरचा खुन केला, परंतु अडीच महीन्यानंतर का होईना कायदयाचे हात त्याचेपर्यंत पोहचले.
सदरची कामगिरी मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा श्री. विजय मगर सो, पोलीस उप-आयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील साो, सहा. पोलीस आयुक्त सी, येरवडा विभाग, पुणे शहर, याचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा छडा वपोनि श्री. विश्वजित काइगडे, तपास पथकाचे सपोनि श्री रविंद्र गोडसे पोलीस उप निरीक्षक श्री रेशीम कोळेकर, पोलीस हवा/५४४८ श्री प्रकाश आव्हाळे, पोलीस नाईक ७४१९/श्री स्वप्निल जाधव, ७४४७/श्री अजित फरांदे, सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यानी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

