लोणीकंद तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगणा-या दोन इसमांना केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :– दिनांक – १२/०१/२०२४ रोजी मा. श्री. विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व तपास पथकातील पोलीस नाईक ७४१९ जाधव, पोलीस नाईक ७६२१ साळुंके, पोलीस नाईक ७४४७ फरांदे, पोलीस नाईक ७३०९ साळवे यांना पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने वरील अधिकारी व अंमलदार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक कैलास साळुंके यांना त्यांचे गोपनीय खब यामार्फत बातमी मिळाली की, केसनंद थेऊर रोडवरील कोलवडी येथील दर्गाजवळ असलेल्या जयभवानी स्वीट्स या दुकाना समोरील मोकळ्या जागेत काळ्या रंगाचे जॅकेट (हुडी) व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली एक इसम उभा असुन त्याचेजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आहे. लागलीच पोलीस नाईक ७६२१ साळुंके यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे यांना सांगितली असता त्यांनी सदरची बातमी श्री. विश्वजीत काईगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्याप्रमाणे सपोनि रविंद्र गोडसे व वरील पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करुन केसनंद थेऊर रोडवरील कोलवडी येथील दर्याजवळ असलेल्या जयभवानी स्वीट्स या दुकाना समोरील मोकळ्या जागेत काळ्या रंगाचे जॅकेट (हुडी) व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेल्या संशयित इसम नामे सागर बाळासाहेब गाढवे, वय २८ वर्ष, रा. गाढवे मळा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात ०१ देशी बनावटीचे पिस्टल मिळुन आल्याने त्याचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद आरोपीकडे चौकशी केली असता त्याने सदरचे शस्त्र त्याचा साथीदार नामे योगेश जयसिंग झेंडे, वय ३५ वर्षे रा. भेकराईनगर, शिवशंकर मंगल कार्यालया शेजारी, फुरसंगी याचेकडे घेवुन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असुन दोन्ही आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असुन मा. न्यायालयाने त्यांना दिनांक १५/०१/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

असुन नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास विनायक साळवे, पोलीस नाईक ७३०९, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. शशीकांत बोराटे सो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील सो, सहा, पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. श्री. विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, सपोफौ बाळासाहेब सकाटे, पोलीस हवालदार ६४७७ तिकोणे, पोलीस नाईक स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, सागर जगताप, पोलीस शिपाई मल्हारी सपुरे, साई रोकडे लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!