कोडीत गावात शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेणारे दोन इसमांना घेतले ताब्यात


पंकेश जाधव संपादक 7020794626

सासवड पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर लागवड करून उत्पादन घेवतून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत.

पुणे ग्रामीण जिल्हयाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख साहेब यांनी पदभार स्विकारल्यापासून अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना केले होते.

Advertisement

दि. २४/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कोडीत ता. पुरंदर जि पुणे गावातील इसम नामे दशरथ बडधे व तान्हाजी बडधे यांनी त्यांचे शेतात विनापरवाना बेकायदेशीरपणे अफुची लागवड करून उत्पादन घेतले आहे. अशी बातमी मिळाली होती. सदर बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सासवड व राजगड पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व स्टाफचे मदतीने वरीष्ठ अधिकारी यांचे आदेश व परवानगीने राजपत्रीत अधिकरी व पंचांसह जावून मौजे कोडीत बु ॥ गावातील मलाईवस्ती येथे गेले. मलाईवस्ती लगतच्या दोन वेगवेगळया शेतात जावून पाहणी करून कारवाई केली असता, शेतामध्ये उपस्थित इसम दशरथ सिताराम बडचे वय ६५ वर्षे, व तान्हाजी निवृत्ती बडधे वय ६९ वर्ष, दोघे रा. कोडीत वु ॥ ता. पुरंदर, जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले, एकूण १० किलो ५०० ग्रॅम वजनाची अफुची ओली बोंडे किं. रू २१,०००/- ची जप्त करणेत आलेली आहेत. अफुची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा व शेवंती फुलांची लागवड करणेत आलेली होती. सदर दोन्ही इसमांविरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७६ / २०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ व, ८क, १७ क, २९ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्रीकांत पांडुळे, भोर विभाग, सासवड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे पो.नि. राजेश गवळी, स्था.गु.शा. चे सपोनि राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडु विरकर, सासवड पो स्टे कडील पोलीस अंमलदार सुरज नांगरे, जब्बार सय्यद, प्रतिक धिवार, मपोना करंडे, मपोना भुजबळ यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि बाजीराव डेकले, सासवड पोलीस स्टेशन हे करत असून गुन्हयातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!