शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अपघाताच्या गुन्हयात चालकास शिवाजीनगर न्यायालयाकडुन शिक्षा


पंकेश जाधव संपादक 7020794626

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १२/०७/२०१९ रोजी फिर्यादी रोहन पाषणकर हे कुंटुंबियासह कारमधुन रोडने जात असताना ट्रकचालक नामे महादेव नरहरी वाघमारे वय-२८ वर्षे याने त्याचे ताव्यातील ट्रक हा बेदरकारपणे वेगाने हयगयीने चालवुन फिर्यादीचे कारला जोरदार धडक दिल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गु.र.क्र.३२६/२०१९ भादवि कलम २७९,१८४,४२७ सह मो. वा. का. कलम ११९/१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि बिनवडे यांनी करुन गुन्हयाचे दोषारोप मा. शिवाजीनगर न्यायालयात दाखाल करण्यात आले होते.

Advertisement

नमुद केस ची सुनावणी मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. तोतला यांचे न्यायालयात झाली असुन मा. न्यायालयाने गुन्हयातील चालक आरोपीस भादवि कलम २७९ अन्वये कोर्ट उठेपर्यत शिक्षा व ३००० भरपाई अशी शिक्षा व त्याचे पालन न केल्यास ८ दिवस साधे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर केसचे कामकाज सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्रीमती प्रियंका वेंगुर्लेकर यांनी पाहीले आहे.

सदरची केसचे साक्षीदार कोर्टात हजर ठेवण्याचे समन्स, वॉरंट बजावण्याचे कामकाज मा. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ व मा. वसंत कुवर, सपोआ विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. चंद्रशेखर सावंत, सपोनि बाजीराव नाईक प्रपोनि (गुन्हे) नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार भापकर, सोनवणे, बेंद्रे, शिंदे, शिंदे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!