फरासखाना पोलीस स्टेशन कडुन दुचाकी चोरणाऱ्या आरोपींकडुन चार दुचाकी जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोो, प्रशांत भरमे यांच्या आदेशाने तपास पथकातील पोलीस अंमलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर असे वाहन चोरी झालेल्या ठिकाणापासुन सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करत असताना दोन संशयीत इसम वारजे माळवाडीचे दिशेने जात असल्याचे दिसल्याने तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. वैभव गायकवाड, पोलीस अंमलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर, सुमित खुट्टे असे वारजे माळवाडी भागात जाऊन शोध घेत असता सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यातील वर्णनाप्रमाणे इसम गणपती माथा वारजे माळवाडी येथे थांबले असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला असता सी.सी.टी.व्ही फुटेजमधील वर्णनाप्रमाणे दोन इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव व पत्ता १) संतोष बालकिसन बिरादार, वय-३४ वर्षे, सध्या रा-अगर भारत सोसायटी, गणपती माथा, एन.डी.ए रोड वारजे माळवाडी, पुणे मुळ रा-मु.पो. शिरोळ, ता-उदगीर, जि-लातुर २) सोमनाथ हनुमंत पवार, वय-२९ वर्षे, रा-दांगट इस्टेट, कमान नं १ जवळ, अहिरेगांव, गणपती माथा, वारजे माळवाडी, पुणे, मुळ रा-मु.पो साखरवाडी, ता-फलटण, जि-सातारा असे असल्याचे सांगितले. तेव्हा त्याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेऊन येऊन तपास करता त्याने फरासखाना पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हयातील मोटारसायकल चोरली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास फरासखाना पोलीस स्टेशन गु.रजि.नं ६८/२०२४ भा.दं.वि कलम ३७९ मध्ये अटक करून अधिक तपास करता त्याने फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतुन २ य हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतुन १ मोटार सायकल अशा एकुण ४ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले असुन सदरच्या मोटारसायकली जप्त करून फरासखाना पोलीस स्टेशन कडील ३ गुन्हे व हिंजवडी पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा असे ४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Advertisement

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार सोो. मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार सोो. मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सोो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे संदीपसिंह गिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्रीमती रुक्मिणी गलंडे यांचे यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, प्रमोद मोहीते, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, किशारे शिंदे, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, शशीकांत ननावरे, नितीन जाधव, तुषार खडके, अजित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!