उरूळी कांचन पोलीसांनी ९५४० लिटर तयार गावठी दारू व ५३५० लिटर कच्चे रसायन असे एकूण ८,८७,६००/- ची गावठी हातभटट्री दारू केली जप्त


पत्रकार  :- विशाल धाकतोडे (पुणे ग्रामीण)

उरूळी कांचन पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दिनांक २६/०२/२०२४ रोजी उरुळी कांचन पोलीस स्टेशन हददीत सोरतापवाडी पग्मिरात मोठ्या प्रमाणात गावठी हातभटट्टी तयार करून त्याची विक्री करत असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना गोपणीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक सुधिर पाडुळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, प्रमाद नवले. पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड ब.नं. ९७२, पोलीस हवालदार रणजित निकम ब.नं. २०५८ पोलीस हवालदार मचिन जगताप ब. नं. २०५५, महिला पोलीस हवालदार मनिषा कुतवळ ब.नं. २०२२, पोलीस नाईक प्रमोद गायकवाड ब.नं. २४०५या पथकाने मिळाले बातमीच्या ठिकाणी मौजे सोरतापवाडी, शिंदवणे गावचे हददीत कॅनॉलच्या कडेला गावठी हातभटट्रीची तयार दारू करण्यासाठी भटट्टी चालु असल्याचे दिसले सदर ठिकाणी छापा टाकुण एकुण ५००० लिटर कच्चे व जळके रसायन तसेच गावठी हातभटट्टीची तयार दारू ५२५ लिटर असा एकुण किंमत रूपये २४२५५०/- चा मुददेमाल जप्त करण्यात आला व कच्चे व जळके रसायन जागीच नाश करण्यात आले.

सदर गावठी हातभटट्टी मानवी आरोग्यास अपायकारक तयार दारू तयार करणारी महिला कयादु राठोड हि पोलीसांची चाहुल लागताच पळून गेली सदर बाबत उरुळी कांचन पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८/२०२४ भा.द.वि.क ३२८ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ (c) (d) (e) (f) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Advertisement

तसेच मीजे कोरगांव मुळ गावचे हदद्दीत राजेंद्र चौधरी यांचे नर्सरीमध्ये तो गावठी हातभटट्रीची तयार दारूचा साठा मोठ्या प्रमाणात जवळ बाळगून तो ओळखीच्या लोकांना विकी करत असल्याचे गोपणीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने उरूळी कांचन पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकूण ३५० लिटर कच्चे स्सायन तसेच गावठी हातभटट्रीची तयार दारू ९०१५ लिटर असा एकुण किंमत रूपये ६,४५,०५०/- चा मुददेमाल जप्त केला आहे. सदर बाबत उरूळी कांचन पोलीस स्टेशन गु.र.नं.६९/२०२४ भा.द.वि.क.३२८,३४ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम (डी) (इ) प्रमाणे इसम नामे राजेंद्र चौधरी व जमीन मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयांचे पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक, सुधीर पाडुळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. मा.श्री. संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक, बारामती, मा. श्री. स्वप्निल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड विभाग दौड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधिर पाडुळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक. प्रमोद नवले, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड ब.नं. ९७२, पोलीस हवालदार रणजित निकम ब.नं. २०५८, पोलीस हवालदार सचिन जगताप ब.नं. २०५५, महिला पोलीस हवालदार मनिषा कुतवळ ब.नं. २०२२ पोलीस नाईक प्रमोद गायकवाड ब.नं. २४०५, यांचे पथकाने केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!