विधीसंघर्षित बालकाकडुन महागडी दुचाकी गाडी जप्त करुन वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर व मा. पोलीस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना पोलीस स्टेशन अभिलेखावरील न चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १०८५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) या गुन्हयातील चोरीस गेले रॉयल एनफील्ड कंपनीचे थंडर बर्ल्ड दुचाकी गाडी क्रमांक MH12MU9890 हीचा व वाहन चोरीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील चोरीस गेले रॉयल एनफील्ड कंपनीचे थंडर बर्ल्ड दुचाकी गाडी क्रमांक MH12MU9890 ही घेवुन एक इसम सुखसागर नगर, बनकर शाळेजवळ, गुरुदत्त हाईटस येथे थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नमुद अंमलदार यांनी सुखसागर नगर, बनकर शाळेजवळ, गुरुदत्त हाईटस येथे जावुन पाहता तेथे रॉयल एनफील्ड कंपनीचे थंडर बर्ल्ड दुचाकी गाडीसह एक विधीसंघर्षीत बालक मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!