कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी!पेट्रोलींग दरम्यान दोन संशयीत वाहनाची तपासणी करता मिळाले वाहनचोर त्यांचेकडुन एकूण ८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले यश.
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणेस वाढत्या प्रमाणात दाखल होणा-या वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध होण्याचे अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १२/१२/२०२३ रोजी सायं. १८/०० वा. चे सुमारास पो, अंग/१०११६ भोसले व पो. अंम/९८३८ बनसुडे हे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना आंबेकर हॉटेल चौक पिसोळी येथे एक इसम निळ्या रंगाच्या यमाहा कंपनीच्या दुचाकी वाहनावर बसलेला दिसुन आला. सदर वाहनाचे मागील व पुढील बाजुस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसुन आल्याने त्यांनी त्याचेकडे सदर वाहनाचे कागदपत्राबाबत व लायसन्सबाबत विचारणा केली तेव्हा तो त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागल्याने, त्यांनी त्यास गाढीसह कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणले. त्यावेळी त्याने सदरचे वाहन हे चोरी करुन आणल्याचे सांगितले. सदरबाबत त्यांनी अभिलेख तपासले असता, त्याचेकडे मिळून आलेले वाहन हे कोंढवा पोलीस स्टेशन गुरनं. ११९६/२०२३ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरबाबत त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे दिनेशकुमार पाटील यांना कळविली त्यांनी सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांना त्यांना सदर इसमास ताब्यात घेवुन माहीती घेवुन कारवाई करण्यास कळविले तेव्हा त्या इसमास त्याचा नाव व पत् त्याने त्याचे नाव सोहेल मन्सुर पोटोदे, वय १९ वर्षे, बंदा गॅरेजकाम, रा. संभाजी बारणे यांचे ऑफिसचे मागे शि थेरगाव, पुणे असे असल्याचे सांगितले. व त्याचे ताब्यात मिळुन आलेली गाडी जप्त करुन त्यारा कोंढवा पोलीस स्टेश घेवुन आले.
पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे तपास करता त्याने त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालकाचे सोबतीने आणखी पाच दुचाकी चोरल्याचे निषान्न करुन ६ दुचाकी जप्त करुन
१. कोंढवा पोलीस स्टेशन गुरनं. ११९६/२०२३ भादवि कलम ३७९,
२. कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं, १८०/२०२३ भादवि कलम ३७९,
३. कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं. ७५६/२०२३ भादवि कलम ३७९, ४. कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं. ७९७/२०२३ भादवि कलम ३७९,
५.कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं. ७५१/२०२३ भादवि कलम ३७९ व
६. लष्कर पोलीस स्टेशन येथे गुरनं ९४/२०२३ भादवि कलम ३७९
असे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
त्याचप्रमाणे दि. १३/१२/२०२३ रोजी रात्री २०/०० वा. चे सुमारास आम्ही स्वतः स्टाफसह कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना खडीमशीन चौक जवळ एक इसम काळ्या रंगाच्या दुचाकी वाहनावर बसलेला दिसुन आला. त्यारा हटकले असता तो तेथुन गाडी सोडुन पळु जावु लागला. तेव्हा आम्ही आमचे सोबत अरालेल्या स्टाफचे गदतीने त्यारा ताब्यात घेऊन त्यास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सौरभ राजेंद्र भोसले, वय २३ वर्षे, रा. कोटी, सवडी, सोलापुर जिल्हा असे असल्याचे सांगितले, त्यानंतर त्यास त्याचे ताब्यात असलेल्या दुचाकी वाहनाबाबत चौकशी करता तो उड़वा उडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा त्यास त्याचे ताब्यात असलेल्या वाहन सोबत घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडे असलेले दुचाकी वाहन क्र. एमएच १२ डीडी/२७६४ बाबत माहीती घेता. सदरचे वाहन हे चोरीचे असल्याची माहीती प्राप्त झाली व सदरबाबत कोंढवा पोलीस स्टेशनकडील अभिलेख तपासून पाहता सदरबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं, १२५३/२०२३ भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची माहीती प्राप्त झाली, त्याअन्वये सदरचे वाहन जप्त करुन त्यास कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने एक वाहन आणखी एक दुचाकी चोरी केल्याचे सांगुन त्याचेकडून ती प्राप्त करण्यात आणुन कोंढवा पोलीस स्टेशनकडील गुरनं. १२५३/२०२३ भादवि कलम ३७९ व कोंढवा पोलीस स्टेशनकडील गुरनं. ११५४/२०२३ भादवि कलम ३७९ असे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. अशा तऱ्हने वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरीता लावण्यात आलेल्या पेट्रोलींग दरम्यान एकुण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकास यश आलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, श्री मा अपर पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५ श्री आर राजा, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. शाहूराव साळवे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे कोंढवा पोलीस स्टेशन, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संदीप भोसले व श्री संजय मोगले यांच्या गार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीरा रटेशन येथील रापारा पथकाचे सपोनि दिनेशकुमार पाटील, रापोनि लेखाजी शिंदे, पोलीरा अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेगाणे, निलेश देसाई, लवेश शिंदे, सागर भोसले, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजीत मदन, शाहीद शेख या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

