देशी बनावटीचा ०१ कट्टा व ०२ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहरामध्ये अग्निशस्त्रे जवळ बाळगणारे, शस्त्र पुरविणारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करणेबाबतचे निर्देश मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांचेकडून गुन्हे शाखेकडील अधिकारी यांना प्राप्त झालेले होते.पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे देखरेखीखाली पथक माहिती काढीत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे अग्निशस्त्र बाळगणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अझर रमजान सय्यद, वय २३ वर्षे, रा. म्हसोबा मंदिर, भवानी पेठ, १० नंबर कॉलनी, खडक, पुणे यास मिरा हॉस्पीटल शेजारी रोड त्रिकोणी गार्डन जवळ, जहागिर विलाच्या समोर, कासेवाडी पुणे सापळा रचून त्यास पकडून त्याचे ताब्यातून देशी बनावटीचा ०१ गावठी पिस्टल व ०२ जिवंत काडतूसे असा किं.रु.२१,०००/- चा माल जप्त करून त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.२८३/२०२४ भारतीय शस्र अधिनियम कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, सहा.पो.निरी. प्रशांत संदे, पोलीस अंमलदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराय, दिलीप गोरे, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, चेतन शिरोळकर, अमोल घावटे, अनिल कुसाळकर, गणेश खरात, किशोर बर्गे, चेतन आपटे, आदिनाथ येडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

