३५० व्या श्रीशिवराज्याभिषेक शकाच्या निमित्ताने पारितोषिक वितरण समारंभ !


महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- ३५० व्या श्रीशिवराज्याभिषेक शकाच्या निमित्ताने ज्ञानवर्धिनी अॅकॅडमी व श्रीसाज चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इ. १ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा, इ. ८वी ९ च्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा तर शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी निबंध स्पर्धांचा पारितोषक वितरण समारंभ शिवजयंतीच्या औचित्याने डी. इ. एस्. संस्थेच्या मुख्य प्रबंधक डॉ. सविता केळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

Advertisement

वेशभूषा स्पर्धेत एकूण १९७, वक्तृत्व स्पर्धेत एकूण ३५ तर निबंध स्पर्धेत एकूण १५ जणांनी सहभाग घेतला.ह्यावेळी प्रास्ताविकात बाल आणि युवा पिढीपर्यंत इतिहासाची सत्यता पोहोचावी आणि त्याची आवड निर्माण व्हावी हा या स्पर्धांचा उद्देश असल्याचे श्रीसाज चित्रच्या संस्थापिका सायली गोडबोले – जोशी यांनी सांगितले.अशा स्पर्धांमुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण तयार होते असे मनोगत परीक्षकांच्या वतीने प्रा. अनिता पवार व अपर्णा करंदिकर यांनी व्यक्त केले.

अशा स्पर्धा वारंवार घेऊन सर्वांना इतिहासाच्या अभ्यासासाठी उद्युक्त केले पाहिजे कारण संस्कृती जतनात त्याचा मोठा वाटा असतो, असे कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सविता केळकर म्हणाल्या. स्पर्धकांच्या वतीने शिक्षिका कविता चांदककर व विद्यार्थी तक्षील अभ्यंकर यांनी मनोगते व्यक्त केली.ज्ञानवर्धिनी अॅकॅडमीच्या डॉ. शीतल गोडबोले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नीलाक्षी नरवणे हिने केले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!