उरुळी कांचनजवळील शिंदवणे गावात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद..


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण 

उरुळी कांचन पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- उरुळी कांचनजवळील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात दोन चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या करून मुद्देमाल पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

गुरुवारी (ता. ७) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये घरामध्ये चोरटे प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Advertisement

दत्तात्रेय रघुनाथ महाडिक (रा. शिंदवणे, ता. हवेली) असे चोरी झालेल्या घरातील व्यक्तीचे नाव आहे. तसेच आणखी दोन ठिकाणी चोरी झाली असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय महाडिक हे शिंदवणे परिसरात कुटुंबासोबत राहतात. गुरुवारी संध्याकाळी ते हडपसर याठिकाणे गेले असता अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्य व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले.

दरम्यान, महाडिक हे हडपसर या ठिकाणावरून येऊन घरात जाऊन पाहणी केली असता कपाटात ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. यावरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले. त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता अज्ञात दोन चोरटे तोंडाला रुमाल बांधून घरात घुसल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहेत.

या घटनेची माहिती उरुळी कांचन पोलिसांना दिली असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!