कोरेगाव मूळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.अश्विनी चिंतामणी कड यांची बिनविरोध निवड करण्यात आली
पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- उरुळी कांचन कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.अश्विनी चिंतामणी कड यांची गुरुवार (ता. २१/३/२४) बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच कु.मंगेश अशोक कानकाटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत सौ.अश्विनी चिंतामणी कड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश अशोक कानकाटे यांनी सौ.अश्विनी चिंतामणी कड यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी सतीश मधुकर कालेकर यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले. सौ.अश्विनी चिंतामणी कड यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांकडून फटाके व गुलालाची उधळून करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे उपस्थित सर्व सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच सौ.अश्विनी चिंतामणी कड यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच, ग्रामपंचायत असे सर्वजण एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे सांगताना या कामांसाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

