वानवडी परिसरात वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील वाहनचोर ५०० सीसीटिव्ही फुटेज पाहून जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १३/०३/२०२४ रोजी रात्रौ ०१/०० वा. ते पहाटे ०३/४५ वा. चे दरम्यान ग्रीन व्हॅलीजवळ गोपाळ मेडीकल समोर, वानवडी येथे फिर्यादी यांनी त्यांची टिव्हीएस कंपनीची ग्रे रंगाची अपाचे आरटीआर २०० मो.सा.क्र. एम एच १२ पी वाय ८९२५ ही लॉक करुन पार्क केलेली असताना ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे समंतीशिवाय चोरुन नेली होती. त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २०८/२०२४, भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग, व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींगसाठी दोन पथके तयार केली होती. तपासादरम्यान सीसीटिव्ही मध्ये दिसणारा संशयीत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कासीम सलीम इराणी, रा. पठारे वस्ती, इराणी कॉलनी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे हा असल्याचे माहिती पोलीस अंमलदार विष्णू सुतार, यतिन भोसले, गोपाल मदने यांना मिळाल्याने तात्काळ सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पतंगे सो यांना कळवून तपास पथक प्रभारी संतोष सोनवणे व स्टाफ रवाना झाले. मिळालेल्या माहितीचे आधारे चोरी करणाऱ्या कासीम सलीम इराणी यास

ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली. अटक आरोपीचे नाव खालील प्रमाणे –

Advertisement

१) कासीम सलीम इराणी, वय. २५ वर्षे, धंदा. काही नाही रा. पठारे वस्ती, इराणी कॉलनी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे

वर नमूद अटक आरोपीत याचेकडे अधिक तपास करता त्याने त्याचे साथीदार मोहम्मद सय्यद इराणी, वय ३०, रा. सदर याचे मदतीने सदर वाहनचोरी केली असल्याचे तसेच वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत आणखीन एक ठिकाणी वाहनचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद आरोपीकडून १) वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २०८/२०२४, भा.दं.वि. कलम ३७९ २) वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १७८/२०२४, भा.दं.वि. कलम ३७९ हे गुन्हे उघड करण्यात आलेले असून सदर गुन्हयातील चोरीच्या कि.रु. १,१०,२५०/- च्या टिव्हिएस अपाची व सुझुकी अॅक्सेस असे दोन दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर श्री आर राजा, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार सर्फराज देशमुख, वानवडी पोस्टे पुणे. हे करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!