नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोबाईल व्हॅनद्वारे दंतरोग तपासणी शिबीर
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- नागपूर मध्यवर्ती कारागृहात विविध आजाराने ग्रस्त असलेल्या बंद्यांच्या आरोग्याची काळजी कारागृह प्रशासनामार्फत घेण्यात येते. दंतरोग आजाराने ग्रस्त असलेल्या बंदयांचे कारागृहात वेळेत उपचार होण्यासाठी कारागृह प्रशासनाने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांचेकडे समन्वय साधून दिनांक ०४/०४/२०२४ ते ०५/०४/२०२४ या कालावधीत मोबाईल व्हॅन सहित १० दंतरोग तपासणी शिबीर, तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्याने कारागृहातील महिला व पुरूष बंद्यासाठी शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. सदरील दंत तपासणी शिबीरामध्ये १० महिला बंदी तर ३०६ पुरुष बंदी असे एकून ३१६ बंद्यांचे दंत तपासणी करून उपचार करण्यात आले. सदरील उपचारामध्ये सिमेट भरणे, दंत सफाई करणे, दात काढणे , व आवश्यकतेनुसार बंदयांवर उपचार करण्यात आले.त्यामुळे मोठया प्रमाणात बंदयाचे तक्रारी कमी होवून बाहेरील रुग्णालयात पाठविण्यासाठी येणारा पोलीस पथक व सुरक्षेवरील ताण कमी झाला.
मोबाईल व्हॅन सहित दंत तपासणी शिबीर मा. वैभव आगे, अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर यांचे मार्गदर्शनमध्ये आयोजित करण्यात आले. या शिबिरास डॉ. सचिन खत्री, विभाग प्रमुख, सामाजिक दंतशास्त्र विभाग, शासकीय रुगणालय नागपूर, डॉ. अनिकेत धोटे, सहाय्यक प्राध्यापक, सामाजिक दंतशास्त्र विभाग, शासकीय रुगणालय नागपूर, डॉ. अभिनव आलोक, डॉ.निशा यादव, डॉ.साक्षी मांडवले, डॉ.उमेश सुरोसे, डॉ.सुरक्षा वडनकर, डॉ. राहुल शाळुंके, श्री. नितेश खोब्रगाडे, श्री.अनिकेत मसराम, प्रयोगशाळा सेवक इत्यादी च्या मदतीने बंद्यांचे दंत शल्यचिकित्सा करण्यात आले.
सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी या कारागृहाचे सामाजिक कार्यकर्ता श्री. धनपाल मेश्राम, श्री.कृष्णा पाडवी, श्रीमती मीना लाटकर यांनी परिश्रम घेतले आहे. सदरील दोन दिवसाच्या दंत शल्यचिकित्सा शिबिराचे आयोजनासाठी श्रीमती दीपा वै.आगे, उपअधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृह, श्री. आनंद पानसरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, तसेच इतर अधिकारी कर्मचीर देखील उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

