जळगांव जिल्हा कारागृहाकरीता सी.सी.टी.व्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष, अॅलन स्मार्टकार्ड टेलिफोन ई-लायब्ररी, ५० इंच टेलिव्हिजन संच मा. श्री यु.टी. पवार कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांचे शुभ हस्ते कार्यन्वित करण्यात आले


पंकेश जाधव संपादक 7020794626

Advertisement

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य “सुधारणा व पुनर्वसन” अंतर्गत मा.श्री अभिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे याचे प्रेरणेने तसेच मा. श्री डॉ.जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हा कारागृहाकरीता सी.सी.टी.व्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष, अॅलन स्मार्टकार्ड टेलिफोन ई-लायब्ररी, ५० इंच टेलिव्हिजन संच प्राप्त झाले आहे त्याअनुषंगाने आज दिनांक २३.०५.२०२४ रोजी मा. श्री यु.टी. पवार कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांचे शुभ हस्ते कार्यन्वित करण्यात आले आहे. तसेच सदर कार्यक्रमास मा.श्री आयुष प्रसाद (भा.पो.से.) जिल्हाधिकारी जळगांव व मा. श्री एस.एन. राजुरकर जिल्हा न्यायाधीश जळगांव १ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जळगांव जिल्हा कारागृहातील बंदयाना आयुष्यमान भारतकार्ड राष्ट्रभक्तोपर निवध स्पर्धा विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप मा.श्री यु.टी. पवार कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक, व मा.श्री आयुष प्रसाद (भा.पो.से.) जिल्हाधिकारी जळगांव व मा. श्री एस.एन. राजुरकर जिल्हा न्यायाधीश जळगांव-१ यांचे हस्ते करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमानिमित्त श्री ओ.आर बांडेकर अधीक्षक जळगांव जिल्हा कारागृह, श्री गजानन विठ्ठल पाटील वरिष्ठ तुरुंगाधिकारी, श्री एस.पी.कवार तुरुंगाधिकारी श्रेणी-२. व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!