पिंपरी चिंचवड पोलीसांची संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी मुहे टोळीवर”मोका अंतर्गत कारवाई
आजिद इनामदार उप संपादक 99604 16422
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे, मालाविरुध्दचे गुन्हे करणारे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. मा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील २२ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १३५ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गु.रजि.नं ३३२/२०२४ भादंवि. ३९८, ३८७, ५०४, ५०६(२), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महा.पो.का. कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रि. लॉ.अ. अॅक्ट कलम ७ या गुन्हयांचे तपासमध्ये आरोपी नामे १) योगराज ऊर्फ बिट्या विश्वनाथ मुन्हे (टोळी प्रमुख) वय ३६ वर्षे रा डेफोडील्स सोसायटी, सी विंग, घर नं ११०४, सोमाटणे ता. मावळ जि. पुणे २) प्रेम सुरेश सोनवणे वय २१ वर्षे रा. कोथुर्णे पवनानगर, ता. मावळ जि. पुणे ३) अमित मच्छींद्र शेटे वय ३५ वर्षे बालाजीनगर, चाकण ता. खेड जि. पुणे ४) लहु अशोक भालेकर वय ३२ वर्षे रा.झेड पी शाळेचे पाठीमागे, विठ्ठलवाडी, सोमाटणे, ता. मावळ जि.पुणे ५) सुरज ऊर्फ बंट्या दत्तु गायकवाड वय २१ वर्षे रा.हरपळे आळी, खंडोबा माळ समोर, फुरसुंगी हडपसर पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १२ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे. वरील टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी तळेगाव दाभाडे, पिंपरी, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणीसाठी पळवून नेणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे, तोडफोड करणे, बेकायदेशिर अग्निशस्त्रे व जिवघेणी हत्यारे जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे चढत्या क्रमाणे गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तीक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसचे जनमानसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संदिप डोईफोडे (गुन्हे), मा. पोलीस उप-आयुक्त बापु बांगर (परि-०२), मा. सहा. पोलीस आयुक्त कुऱ्हाडे (गुन्हे१), यांच्या मार्गदशनाखाली वपोनि श्री. प्रदिप रायण्णावार (तळेगाव दाभाडे पोस्टे), पोलीस निरीक्षक श्री. अनिल देवडे (पी.सी.बी गुन्हे शाखा), पोहवा तारु (तळेगाव दाभाडे पोस्टे), पोहवा सचिन चव्हाण, पोहवा व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

