येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी निर्मित विविध वस्तुंचे विक्रि व प्रदर्शना
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सुधारणा व पुनर्वसन” हे कारागृह विभागाचे ब्रीद असुन कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक आहे. बंद्यांमध्ये विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात व त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने बंदी निर्मित विविध वस्तुंचे विक्रि व प्रदर्शनासारखे उपक्रम कारागृह प्रशासनामार्फत नियमितपणे राबविण्यात येतात. त्यानुसार १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व येरवडा मध्यवती कारागृह यांचे संयुक्त विद्यमाने बंदी निर्मित वस्तुंचे विक्रि व प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन दि.१३.०८.२०२४ रोजी पासून जिल्हा व सत्र न्यायालय, अशोका हॉल शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले आहे.
सदर विक्रि व प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन सन्मा. श्री. एम. के. महाजन, प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश, शिवाजीनगर, पुणे यांचे शुभहस्ते व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे, श्रीमती. सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, श्री. खामकर, अध्यक्ष, जिल्हा बार कौन्सील, पुणे व जिल्हा सत्र न्यायालय येथील सन्मा. न्यायाधीश व अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आले. सदर विक्रि व प्रदर्शन केंद्रात बंद्यांनी सागवान लाकडापासुन तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तु, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, जीवनापयोगी विक्रिस उपलब्ध आहेत. प्रदर्शनास सामान्या नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी वस्तु मुख्य आकर्षक ठरत आहेत.
सदर उपक्रम मा. प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संकल्पनेतून व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे श्रीमती. पी पी कदम, अति. अधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. सी आर सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२ श्री. बी एम शिंदे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२ यांनी कामकाज पाहीले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

