शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकाची धडाकेबाज कामगिरी ११.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले एकुण ५३ मौल्यवान मोबईल फोन हस्तगत
पंकेश जाधव संपादक 7020794626
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्युज ! ऑनलाईन पुणे :- शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर कक्षाचे सपोनि कैलास डाबेराव, पोहवा रुपेश वाघमारे पोशि आदेश चलवादी, मपोशि रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन, त्याबाबत तांत्रिक तपास करुन त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तसेच इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्याशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा विविध भाषामध्ये संवाद साधून हरवलेले एकुण ११.५० लाख रु.कि.चे ५३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोचाईल फोन संबधीत तक्रारदार यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री प्रविण पाटील सो व परीमंडळ ०१ चे पोलीस उपआयुक्त, श्री संदिपसिंह गिल्ल सो यांचे हस्ते परत करण्यात आले. सदरमोबाईल परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
पुणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, आपण प्रवास करताना बस मध्ये चढताना अगर उतरताना आपले मोबाईल व इतर मौल्यवान वस्तु संभाळावे. तसेच संशयीत व्यक्ती वाटल्यास तात्काळ ११२ या नंबरवर संपर्क करावा. किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला जावुन तक्रार करावी.
मोवाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे punepolice.gov.in/Lost Found Reg या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंद करावी, नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशनचे नाव त्यात सिलेक्ट करावे व आपले जवळच्या पोलीस स्टेशनला जावुन त्याची एक कॉपी द्यावी. त्यानंतर हरवलेले मोबाईल मधील त्याच नंबरचे नविन सिमकार्ड घेवुन ते चालु करुन घेतल्यानंतर शासनाचे https://www.ceir.gov.in/ (CEIR) या पोर्टलवर नोद कराची. नोंद करताना सदर वेबसाईटवर अर्जदाराचे तक्रारीची प्रत, मोबाईल पावती तसेच ओळखपत्र याची PDF अपलोड करुन चालु केलेल्या मोबाईल वर OTP प्राप्त करुन सबमिट करावी. असे आवाहन पुणे पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, मा.प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १, मा. साईनाथ ठोंबरे, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. चंद्रशेखर सावंत, पोनि (गुन्हे) श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, सपोनि कैलास डाबेराय, पोहवा रुपेश वाघमारे, पोशि आदेश चलवादी, पोशि रोहित झांबरे, मपोशि रुचिका जमदाडे यांनी केली आहे.
पो. नि.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

