अवैधरीत्या घातक व धारधार शस्त्र बाळगल्या प्रकरणी मोक्का अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीची जामिनावर सुटका
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील, रामटेकडी वस्तीतील मुज्जमील शेख व त्याचे दोन मित्र फिर्यादी याच्या राहते घराचे शेजारील हॉटेल बाहेर उभे राहून, त्यातील मुज्जमील याने त्याच्या कमेरला लावलेला कोयता काढून, माझ्याकडे दाखवून मला घाबरवले. व आम्ही रामटेकडीचे भाई आहोत, तुझा भाऊ गेला एम.पी.डी.ए जेल मध्ये आता तुला बघतो. असे म्हणून आराडाओरडा व धमकी देऊ लागल्याने आजूबाजूच्या दुकानदारांनी लगेच दुकाने बंद केली व रस्त्याने जाणारे लोक सैरावैरा पळू लागल्याने, फिर्यादी याची मुज्जमील शेख व त्याचे दोन मित्र यांचे विरुध्द कायदेशीर तक्रार होती .
त्यानंतर भा. द. वी प्रमाणे कलम ३९२ अंतर्गत मोक्का कारवाई झाली असता, आरोपी तर्फे वकील ॲड. शैलेश बेरे- पाटील यांनी मे. कोर्टात युक्तिवाद केला असता, यांचा युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीची जामिनावर सुटका केली.
Cheif Editor : Pankesh jadhav