पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारा कडुन केले अग्नीशस्त्र जप्त भारती विदयापीठ पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी.


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १६/०९/२०२४ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे सुचना प्रमाणे भारती विदयापीठ पोलीस ठाणे हददीत अधिकारी अंमलदार गुन्हे प्रतिबंधक पेट्रॉलिंग करीत असताना स.पो. फौ. श्री नामदेव रेणुसे व सतिश मोरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी अभय उर्फ अजय अशोक निसर्गंध रा. सिध्दिविनायक कॉलनी सप्तगिरी वाघजाई मंदिराजवळ जांभुळवाडी रोड हा भुमकर चौकाकडुन स्वामी नारायण मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर कमरेला पिस्टल लावुन थांबला आहे अशी माहिती मिळाल्याने बातमीची खात्री करुन सहा पोलीस निरीक्षक श्री. समीर शेंडे, स.पो. फौजदार नामदेव रेणुसे पो.अं. निलेश जमदाडे, सतिश मोरे, सचिन सरपाले असे सदर ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेत असताना स्वामी नारायण मंदिरकडे जाणाऱ्या रोडवरील अप्पाज हॉटेलच्या पाठीमगील बाजुस आरोपी अभय उर्फ अजय अशोक निसर्गंध हा थांबला असल्याचे दिसुन आला त्यावेळी त्याने पोलीसांना पाहिले असता कावरा बावरा होवून तेथून पळून जावू लागला त्यावेळी त्यास पकडुन त्याचेकडे चौकशी करीत असताना तो त्याचे कमरेमध्ये हात घालुन काही तरी लपवुन उडवाडवीची उत्तरे देवू लागला त्यावेळी त्याचा संशय आल्याने त्याचे कमरेची पाहणी केली असता त्याचे जवळ ५०,०००/-रुपये किमतीचे एक गावठी बनावटी पिस्टल व १००० रु. किंमतीचे एक जिवंत काडतुस असा एकुन ५१०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आला आहे. सदर बाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.७५१/२०२४ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ सह महा.पो.अधि कलम ३७(१) (३),१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्री मोहन कळमकर हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नंदिनी वग्यानी साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे, मा. दशरथ पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, मा. शरद झिने, पो.नि.गुन्हे, भा. विदयापीठ पो.ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समीर कदम, सपोनि समिर शेंडे, पोउनि निलेश मोकाशी, स.पो.फी.नामेदव रेणुसे, शैलेंद्र साठे पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनुमंत मासाळ, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सतीश मोरे, अवधतु जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचीन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!