दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! जबरी चोरी करणारा आरोपी रामेश्वर शिवाजी महाडक यास केले जरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– दिनांक २५/०९/२०२४ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा कडील पोलीस अधिकारी सपोनि छबु बेरड पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, गणेश गोसावी,अमोल सरतापे , संदीप येळे, राहुल इंगळे ,विक्रांत सासवडकर हे चंदन नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे व संदीप येळे यांना बातमीदारा मार्फत गोपनीय बातमी मिळाली की लोणीकंद पो स्टे गु र नं ८८५/२०२४ भा न्या स कलम ३०९(४),१२६(२),३५१(२),३१ या गुन्ह्यातील संशयित इसम साई नगरी चंदननगर येथे येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून एक संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रामेश्वर शिवाजी महाडक वय २८ वर्ष रा. समदर्गा ता. औसा जि.लातूर असे सांगितले.तसेच त्याला ऑफिसला आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथीदार सचिन उर्फ आप्पा ढोरे राहणार केसनंद वाघोली पुणे व मंथन धुमाळ रा सांगवी पुणे यांनी फिर्यादीने गाडीला कट मारला म्हणून याचा राग मनात धरून सदरचा गुन्हा तिघांनी मिळून केल्याचे कबूल केले.
वरील गुन्ह्यात निष्पन्न आरोपी रामेश्वर शिवाजी महाडक याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

