पोस्को गुन्हयातील पाहीजे आरोपीस केले जेरबंद…
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१५/१०/२०२४ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार मुंढवा पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त घालत असताना सपोनि बेरड व पोलीस अंमलदार विक्रांत सासवडकर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मुंढवा पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करुन बी.एन.एस. कलम ६५(२),१३७ (२), १४० (२) बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२ अन्वये दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे विजय बामू हा मुंढवा रेल्वे पुलाखाली मुंढवा पुणे येथे येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदर बातमीप्रमाणे कारवाई व आरोपी पकडणेबाबत दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक- २. गुन्हे शाखा पुणे वपोनि श्री बिडवई यांनी योग्य त्या सुचना व आदेश दिलेने त्यांचे आदेश सुचनांप्रमाणे नमूद आरोपीस मुंढवा रेल्वे पुलाखाली पुणे येथे ताब्यात घेणेत आले आहे. सदर पकडलेला पाहीजे आरोपी नामे विजय स्वामी बामू वय ४० वर्षे रास नं ४५ बी एफ सी रोड ताराबाग सोसायटी जवळ, शक्ती नगर घोरपडी पुणे याची ससून हॉस्पीटल येथे वैदयकीय तपासणी करुन त्यास पुढील कार्यवाही करीता मुंढवा पोलीस स्टेशनचे ताब्यात देणेत आले आहे.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई, सहा. पोलीस निरीक्षक छबू बेरड, व पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, सुनिल महाडीक, विनायक रामाणे, विक्रांत सासवडकर गणेश गोसावी, संदीप येळे, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

