रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडुन जेरंबद
पंकेश जाधव संपादक 7020794626
यूनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने दिनांक १७/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार हे युनिट २ चे हददीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना बातमी मिळाली की डायसप्लॉट गुलटेकडी स्वारगेट पुणे येथील कॅनलाजवळ एक इसम अग्निशस्त्र घेवुन थांबलेला आहे. त्याप्रमाणे युनिट २ प्रमुख पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना माहिती दिली. त्यांनी कायदेशीर करावाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे युनिट २ कडील सपोनि अमोल रसाळ व त्याचे पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे डायसप्लॉट गुलटेकडी स्वारगेट पुणे येथील कॅनल जवळुन १८/०० वा. सुमारास मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित इसमास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव सज्जन सुनिल जाधव वय १९ वर्ष रा. डांगे चौक पिंपरी गांव पुणे मुळ रा. रेणुशीमोरा महाबळेश्वर सातारा असे सांगीतले. नमुद पथकाने मिळून आलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५०,४००/-रु. एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व एक जिवंत काडतुस मिळुन आले. त्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. कमांक ४४७/२०२४ भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात आरोपीस गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनिअमोल रसाळ, सपोनि अशिष कवठेकर, पोउपनिरी नितीन कांबळे, पोलीस हवालदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण, विनोद चव्हाण, ओम कुंभार, हनुमंत काबंळे, गणेश थोरात, विजय पवार, राहुल शिंदे अमोल सरडे व नागेश राख यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

