खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर गांजा विक्री करणा-यांना त्यांची शक्कल पडली महागात १,५९,१५०/- रु किं. चा गांजा जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०२/११/२०२४ रोजी खडकी पोलीस स्टेशन कडील स्टाफ हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना मिळालेले बातमीनुसार शिरपूर येथून पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मध्ये २ इसम गांजा घेऊन पुण्यामध्ये येत आहेत. अशी बातमी मिळताच खडकी पोलीस स्टेशन कडील स्टाफने एस.टी. बसच्या रूटची माहीती घेऊन सापळा रचून जुना मुंबई पुणे हायवे, चर्च चौक, खडकी, पुणे येथून जाणारी एस.टी. बस थांबवून बातमीनुसार गांजा घेवून जाणारे इसम १) जाबीर भिकन खाटीक वय ३२ वर्षे, रा. मु.पो. वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे २) सुहेल अली जहीर अली शहा वय २६ वर्षे, रा.मु.पो. चोपडा, ता. जि. जळगांव यांना बसमूधन ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन १,५९,१५०/- रु किं.चा १० किलो ६१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करून त्यांचे विरुध्द खडकी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०८/२०२४, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४. श्री. हिंमत जाधव, मा. सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतिश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले, पोलीस उप-निरीक्षक आण्णा गुंजाळ, पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे, संदेश निकाळजे, प्रताप केदारी, अशिष पवार , अतुल इंगळे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

