उच्चशिक्षीत लॅपटॉप चोरट्यास बिबवेवाडी पोलीसांनी अटक करून लॅपटॉप जप्त केले


पत्रकार इमरान शेख पुणे जिल्हा 

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. १९/१०/२०२४ रोजी दुपारी ०४.१५ वा.ते ४.३० वा.चे सुामरास फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांची लॅपटॉप असलेली बॅग व्ही आय टी कॉलेज बिबवेवाडी पुणे येथील कटयावर ठेवली असता अनोळखी चोरटयाने ८२,०००/-कि.रू चे एक लिनोव्हा कंपनीचा व एच पी कंपनीचा लॅपटॉप हा मुद्दाम लबाडीच्या इरादयाने चोरून नेला म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २४८/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचे मोडस वरून पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, संजय गायकवाड, शिवाजी येवले व सुमित ताकपिरे यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील संशयीत इसम प्रितम तुषार भामरे, वय २१ वर्षे, रा. सिमासागर सोसायटी मातोश्री अपार्टमेंट, सुखसागरनगर कात्रज पुणे. यास दिनांक २३/१०/२०२४ रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडे गुन्हयाचे तपासामध्ये फिर्यादी व साक्षीदार यांचे चोरी करून नेलेले कि.रू. ८२,०००/-रूपयांचे एक लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप व एक एच पी कंपनीचा लॅपटॉप असे एकूण ०२ लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्ष श्री अशोक येवले हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, प्रणय पाटील व अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!