शरद मोहोळ खूनाचा बदला घेणेकामी तयारीत असलेल्या गुन्हेगारांकडून २ पिस्टल व ०७ काडतुसासंह अटक करुन कट उधळला
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- एक वर्षापुर्वी कोथरुड सुतारदरा येथील गुन्हेगार शरद मोहोळ याचा खुन झाला होता सदर झालेल्या खुनास एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्यास प्रत्युत्तर व खुनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगार नामे इसम नामे गुन्हेगार नामे १) संदेश लहु कडू वय २४ वर्ष रा. काळुबाई कॉलनी अथर्व विदयालय शेजारी कोथरुड पुणे व २) शरद शिवाजी मालपोटे वय २९ वर्ष रा. सुतारदरा पांडुरंग कॉलनी कोथरुड पुणे यांनी अग्निशस्त्र आणलेबाबत मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे दिनांक २/०१/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने वरील इसमांना खराडी पुणे येथून ०२ पिस्टल, ०७ जिवंत काडतुस व मोबाईल फोन असा एकुण १,१२,०००/रु. कि. मुददेमाल ताब्यात घेण्यात आले आहे. सदर बाबत खराडी पोलीस स्टेशन येथे ०३/२०२४ आर्म अॅक्ट ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
त्यांनतर तपासामध्ये सदर गुन्हेगार यांनी गंभीर गुन्हा करण्याच्या उददेशाने सदर अग्नीशस्त्रे आणल्याचे निष्पन्न होत असल्याने सदर गुन्हयात बी एन एस १११, ६१ (ब) अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे सदर गुन्हयाचा तपास चालु असून त्यामध्ये आणखी इतर आरोपीताचीही नावे समोर येत असून सदर कटाचे सर्व धागेदारे शोधून काढणेकामी वरिष्ठ पोलीस अधिकारी सूक्ष्म परीक्षण करुन आहेत व इतर आरोपीना शोध व ताब्यात घेण्याकरीता गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-०१. श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनीट ०२ श्री. प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक, नितीन कांबळे पोलीस अंमलदार अमोल सरडे, ओमकार कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, संजय आबनावे, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, संजय जाधव, गणेश थोरात, निखिल जाधव, विनोद चव्हाण, राहूल शिंदे, हनुमत कांबळे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

