हवेली पोलीसांची दमदार कामगिरी !बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना सपाळा रचुन हवेली पोलीसांनी केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

हवेली पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- आज दिनांक १८/१/२०२५ रोजी मी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस हवालदार विलास प्रधान, संतोष तोडकर, दिपक गायकवाड, गणेश धनवे, संतोष भापकर, पोलीस नाईक राजेंद्र मुंढे पो.कॉ. सचिन गुंड असे पोलीस स्टेशन हददीत पेट्रालिंग करत असताना मीजे. खडकवासला धरणचौक परीसरात आम्हास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे. खडकवासला ता. हवेली जि. पुणे गावचे हददीत स्मशानभुमी जवळील परीसरात इसम नाम देवलेश उर्फ देवा साळुंखे व अतिश जोरी हे दोघे थांबले असुन त्यांचे जवळ एक गावठी पिस्टल व राउंड असुन ते कोणाला तरी गावठी पिस्टल विकण्याच्या किंवा कुठला तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याची शक्यता असल्याचे खात्रीशिर बातमी मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची बातमी पोलीस अधिकारी, अंमलदार व पंच यांना बातमीचा आशय समजवुन सांगुन आम्ही बातमी मिळाले ठिकाणी वेगवेगळे दिशेला दबा धरून बसलो. थोडा वेळानंतर तेथे देवलेश उर्फ देवा साळुंखे व त्याचे सोबत एक अनोळखी इसम असे पायी चालत येत असताना अम्हास दिसले. ते दोघेही खडकवासला स्मशानभुमीचे जवळ आल्यावर आम्ही दुपारी १५.३० वा. दरम्यान त्यास जागीच पकडले त्यांना त्यांची नावे विचारली असता १) देवलेश उर्फ देवा सुर्यकांत साळुंखे वय. ३८ वर्ष रा. संत रोहिदासनगर खडकवासला ता. हवेली जि.पुणे २) अतिश मधुकर जोरी वय. २४ वर्ष रा. आझाद तरूण मंडळ खडकवासला ता. हवेली जि. पुणे असे सांगितला असता त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता देवलेश उर्फ देवा सुर्यकांत साळुंखे याचे कमरेस पाठीमाग पॅन्टचे आत खोचुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मिळुन आले तसेच इसम नामे अतिष मधुकर जोरी यांचे पॅटचे खिशात पिस्टलचे एकुण ७ जिवंत काडतुस मिळुन आलेने असे विनापरवाना बेकायदेशीररित्या एक गावठी पिस्टल व ०७ जिवंत काडतुस बेकायदेशीरपणे विनापरवाना जवळ बाळगून स्थितीत मिळून आले आहेत.

सदर बाबत हवेली पोलीस स्टेशनला गु.र.नं. ०९/२०२५ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, (२५) भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ चे कलम ३ (५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ पकडलेले आरोपीतांन विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई मध्ये मा. पंकज देशमुख पोलीस अधीक्षक साो, मा. रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक साो, तसेच मा. दिलीप शिंदे पोलीस उपअधिक्षक मुख्यालय पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि सागर पवार, मपोसई शितल ठंबे, पोलीस हवालदार विलास प्रधान, संतोष तोडकर, दिपक गायकवाड, गणेश धनवे, संतोष भापकर, पोलीस नाईक राजेंद्र मुंढे पो. कॉ. सचिन गुंड यांनी मोठा व गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्या अगोदरच कारवाई केलेली आहे. पुढील तपास मपोसई शितल टेंबे मॅडम करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!