पेट्रोल पंपावरील मॅनेजरला मारहाण करुन त्यांची पैशांची बॅग लुटण्याचा प्रयत्न करणारे तीन बालक भारती विद्यापीठ पोलीसांचे ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक १३/०१/२०२५ रोजी १६/३० ते १७/०० वा. चे दरम्यान फिर्यादी वय ३१ वर्षे, रा. खडकवासला, पुणे हे त्यांचे कात्रज कोढवा रोडवरील एम. के. एन्टरप्रायझेस इंडीयन पेट्रोल पंपावरील दिवसभराची जमा झालेली ३,४६,०००/- रुपये रोख रक्कम ही बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना अनोळखीन तीन मुलांनी त्यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण व दुखापत करुन त्यांची बँग जबरदस्तीने हिस्कावण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ३७/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (५),३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपींचा शोध घेणेबाबतच्या मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार महेश बारवकर, चेतन गोरे यांनी घटनास्थळापासून कात्रज कोंढवा रोडवरील सर्व सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक केले असता त्यांना त्यामध्ये त्यांना तीन संशयीत इसम दिसुन आले. त्या संशयीत इसमांचा नमुद अंमलदार यांनी शोध घेतला असता त्यांना तीन विधीसंघर्षीत बालकांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी त्या तीन बालकांना ताब्यात घेवुन चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

