मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर मुक्त असलेल्या सराईत आरोपीताकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस हस्तगत


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १३/०२/२०२५ रोजी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व युनिट ६ कडील पथक असे लोणी काळभोर पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पो. हवा. सकटे यांना मिळालेल्या खबरीवरून मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर असलेला अभिलेखा वरील आरोपी अनिकेत गुलाब यादव, वय २२ वर्षे यास सोपान नगर, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर, पुणे येथुन ताब्यात घेतले असता त्याचेकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस मिळून आले असुन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपीताविरुद्ध लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. ८९/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून मा. वरिष्ठांचे आदेशाने सदरचा गुन्हा पुढील तपास कामी लोणीकाळभोर पो.स्टे. यांचेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे२) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पो.हवा. सुहास तांबेकर, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!