ड्राय डे च्या दिवशी देशी विदेशी दारू विक्री करणा-यावर कोंढवा पोलीसांची धाड. तब्बल २७,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त.
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि. १४/०४/२०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सन २०२५ चे अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था, तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे हे त्यांच्या सहका-यांसह पेट्रोलिंग करीत असताना पोहवा/११६१ सतिश चव्हाण व पो.अं./८२०१ अभिजीत जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गल्ली नं ३०, शिवनेरीनगर येथील चिकन सेंटरच्या मागे, कोंढवा खुर्द पुणे येथे
कोंढवा पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपी नामे कासम दस्तगीर शेख हा त्याच्या एका सहका-यासह मिळून मा. जिल्हाधिकारी साो., पुणे जिल्हा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सन २०२५ चे अनुषंगाने ड्राय डे घोषीत केलेला असताना सदर आदेशाचा भंग करून त्यांचे ओळखीच्या लोकांना देशी व विदेशी दारूची विक्री करीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले. त्यानंतर कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी तपास पथकातील अंमलदारांसह सदर ठिकाणी छापा टाकला असता रेकॉर्ड वरील आरोपी कासम दस्तगीर शेख हा पोलीस आल्याचे पाहून सदर ठिकाणावरून पळून गेला. त्याचा साथीदार नामे विकासकुमार जग्गा सिंग, वय १९ वर्षे, गल्ली नं. ३६, पत्रा चाळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे (मुळ रा. गाव सेदहा, पोस्ट पिरो, थाना तारारी, जिल्हा भोजपूर, बिहार.) यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून देशी विदेशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम असा एकुण २७,५००/- रू किं चा मुद्देमाल जप्त करून त्याचे विरोधात गु.र.नं. ३१२/२०२५ भा.न्या.सं. कलम २२३ व मुंबई प्रोहिबीशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन विनय पाटणकर, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे रऊफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोहवा /११६१ सतिश चव्हाण, पोहवा/७९ निलेश देसाई, पोहवा/६९५१ विशाल मेमाणे, पोहवा/८४८६ गोरखनाथ चिनके, पो.अं. / ८२०१ अभिजीत जाधव पो.अं./५५५ अक्षय शेडगे, पो.अं. / ८५९१ लक्ष्मण होळकर, पो. अं. / ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं./२१८५ सुजित मदन, पो.अं./४९० सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

