विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान व पुणे कॅन्टोन्मेंट कल्चरल असोसिएशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती संपन्न


उषा सोनवणे पुणे प्रतिनिधी

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे : विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान व पुणे कॅन्टोन्मेंट कल्चरल असोसिएशनच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवर चौक, कॅम्प, पुणे 1. या ठिकाणी सुरेशरावजी पिंगळे ( सचिव – एम्प्रेस गार्डन ) यांच्या अध्यक्षतेखाली व बापूसाहेब गानला ( मा. उपाध्यक्ष – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड ) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे सर, तसेच प्रमुख आयोजक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून कार्यक्रमाचा हेतू व पार्श्वभूमी विषद केली. आपल्या देशामध्ये अनेक समाज सुधारक आहेत, पण त्या सर्वांना जातीमध्ये जखडून ठेवले आहे. ही परंपरा खंडित व्हावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रीय सण म्हणून साजरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

एम्प्रेस गार्डन चे सचिव सुरेशरावजी पिंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” असा मोलाचा संदेश सांगितला व त्यातून प्रेरणा घेऊन अनेक महान व्यक्ती घडल्याचेही सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दैनिक लोकमतचे जेष्ठ पत्रकार व संपादक संजयजी आवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ज्या माणसांना पिण्याच्या पाण्याचा हक्क नव्हता, अशा माणसाला बाबासाहेबांनी सर्वोच्च पदावर नेऊन ठेवले आहे. अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसांच्या हाती देण्याचे काम बाबासाहेबांनीच केल्याचे सांगितले. बाबासाहेब जात – धर्माच्या पलीकडे आहेत. सर्वसामान्य माणसाला मतासाठी लढा न देता मतदानाचा हक्क मिळाला, असा एकमेव देश म्हणजे भारत देश आहे. महिलांना सोबत घेतल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वास होता. शिवबा, ज्योतिबा व बाबा यांच्यातील संबंध प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार दिला. आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी हा वारसा कायम पुढे अबाधित ठेवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Advertisement

संदीप भोसले यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. समाजातील गोरगरीब व महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. त्यांनी समाजातील सर्व जाती धर्मासाठी कार्य केले आहे. त्यांना कोणा एका धर्मामध्ये सीमित करणे अयोग्य आहे, असे सांगितले.

रोहिदासजी गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असे सांगितले की पुढील 50 ते 100 वर्षासाठी काय नियोजन करावे, हे ज्यांना समजते तेच महामानव असतात. आज समाजात मतभेदाचे वातावरण निर्माण केले जाते, संविधानाला जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. आज प्रत्येकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर केला पाहिजे.

याप्रसंगी शाहीर देवा कांबळे व हेमंतराजे मावळे ‘हिंगे लोककला प्रबोधिनी मंच’ यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे पोवाडे गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

याप्रसंगी विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे सर, सुरेशरावजी पिंगळे बापूसाहेब गानला, अँड.अर्जुनराव खुर्पे, प्रशांत यादव, जोशवा रत्नम, सुलतान खान, हसनभाई कुरेशी, विनोद संघवी, आरती महाजन, श्याम सहानी, संतोष कवडे, करण मकवाणी, शैलेश बिडकर, विनोद मथुरावाला, अतुल गायकवाड, सचिन मथुरावाला, दिलीप गिरमकर, विवेक यादव, मंजूर शेख, अशोक पवार, श्रीकांत मंत्री, गौतम महाजन, विवेक यादव, प्रियांका श्रीगिरी, संजयजी शेवाळे, प्रकाश पवार, अँड. कालिदास लोणकर, सुनील गायकवाड, मायाताई ससाणे, उर्मिलाताई आरु, इंदिरा तुपे, सिद्धार्थ परदेशी, रोहिदास गायकवाड, संगीताताई पवार, सुरेशजी शिवरकर, रहमानभाई शेख, , अल्ताफ शेख, सुनील शिवरकर, अँड.प्रशांत यादव, कांचन बालनायक अजिंक्य शिवरकर, अशोक शिवरकर, आनंतराव शिवरकर, सूर्यकांत देडगे, दत्ता शिवरकर, ज्ञानेश्वर कांबळे, प्रवीण जाधव, बाळासाहेब हिंगणे, हेमंत गाढवे, विशाल हाके, विजय कोद्रे, कैलास कोद्रे, लक्ष्मण कोद्रे, सुनील खांदवे, माणिकराव गव्हाणे, चंद्रकांत तोंडारे, गणेश फुलारे, नितीन आरू, मनोज खंडेलवाल, किशोर शिवरकर, शहाजी खंडागळे तसेच विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. शिक्षण मंडळ सदस्य विजय जाधव यांनी व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी केले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!